अर्धवट पिकलेल्या कैरीचा मुरांबा(kayricha moramba recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

बऱ्याचदा जास्त कैऱ्या घरात आल्या की त्यापैकी १-२ कैऱ्या वापरायच्या राहून जातात.हळूहळू त्या पिवळसर रंगाच्या होतात.एकदम आंबट चवही नसते आणि धड गोडही नसतात. म्हणजे आंबट गोड अशा मिक्स चवीनुसार असतात.त्यांच्यापासून पण आपण बरेच पदार्थ बनवतो की...मुरांबा म्हटलं की तो कच्च्या कैरीचा आणि साठवणी चा केला जातो.पण मी ह्या अर्धवट पिकलेल्या कैरीचा मुरंबा नेहमी करते.तो साठवणीसाठी करत नाही १-२ आठवडे पुरेल इतकाच. ह्या कैरीचा मुरांबा करताना फायदा असा की कैरी आधी शिजवावी लागत नाही, थोडी गोडसर असल्याने साखर कमी घालावी लागते.आणि रंग तर केशर न घालताही केशरासारखा येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
३-४
  1. 1/2 कपसाल काढून कैरीचे तुकडे
  2. 1 टीस्पूनसाजुक तूप
  3. 1/4 कपसाखर
  4. 1/2 कपपाणी
  5. 2लवंग
  6. 1/4 टीस्पूनवेलचीपूड...जास्त घातली तरी चालते

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    कैरीची साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या.त्या तुपावर छान परतून घेतल्या.

  2. 2

    नंतर त्यात साखर, पाणी, लवंग घालून छान उकळत ठेवल्या.सतत ढवळत राहिले,नाहीतर खाली चीकटतील.

  3. 3

    १०-१२ मिनिटात छान पाक तयार होतो. त्यात वेलची पूड घातली. पाक छान दाटसर झाला पाहिजे.थंड झाल्यावर तो अजून दाट होतो.त्या हिशोबाने त्याचा दाटपणा ठेवावा. १० मिनिटात फोडी पण व्यवस्थित शिजतात.लवंग आणि वेलचीचा खूप छान सुगंध येतो.

  4. 4

    मुरांबा तयार झाल्यावर बाउल मध्ये काढला.थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवला. लहानपणी पोळीला तूप लावून त्यावर मुरांबा लाऊन रोल करून मी डब्यात नेत असे.मला खूप आवडायचं. ब्रेड स्लाइसला लावूनही छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes