झटपट अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#SSR भारती संतोष किणी

झटपट अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)

#SSR भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
8 सर्व्हिंग्ज
  1. 6अळूची पाने
  2. 1/4 किलोबेसन
  3. 3 चमचेतांदळाचे पीठ
  4. 2 चमचेआलं मिरची लसूण पेस्ट
  5. 2 चमचेमसाला
  6. 1/2 चमचाहळद
  7. 2 चमचेधने जीरे पावडर
  8. 1 चमचागरम मसाला
  9. 2 चमचेसफेद तीळ
  10. 1पळी तेल
  11. 1/2 चमचाहिंग
  12. 1 वाटीचिंचेचा कोळ
  13. 50 ग्रॅमगूळ
  14. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन त्याच्यामागे जो देठ असतो तो थोडं सुरीने काढून ठेचून तयार घेणे तसेच एका पातेल्यात चिंचेचा कोळ काढून त्यात गुळ विरघळून घेणे व आलं मिरची लसूण यांची पेस्ट तयार करणे.

  2. 2

    चिंचेचा कोळ काढलेल्या भांड्यातच बेसन, तांदळाचे पीठ,आलं मिरची लसूण पेस्ट, हळद, मसाला, धने जीरे पावडर, गरम मसाला, तीळ, मीठ, तेल सर्व घालून एकजीव करावे व थोडे थोडे पाणी घालून त्याचा थोडा घट्ट असा घोळ तयार करून अळूची पान उलट ठेवून त्याच्यावर केलेले मिश्रण लावून परत दुसरे पान विरुद्ध दिशेने लावावे व परत तयार मिश्रण लावावे.

  3. 3

    मिश्रण लावलेले पान चारी बाजूने फोल्ड करून त्याचा रोल बनवावा व आपण मोदक उघडतो त्याप्रमाणे वडी दहा मिनिटे फास्ट गॅसवर उकडून घ्यावी.

  4. 4

    वाफवलेली वडी थंड झाल्यावर त्याचे गोल तुकडे करून गॅसवर तवा ठेवून ती शॅलो फ्राय करावी किंवा डीप फ्राय करावी.

  5. 5

    सर्व्ह करण्यास रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes