पुरणाचे उकड दिंड (Purnache Ukad Dind Recipe In Marathi)

#SSR
नागपंचमीला पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य केला जातो. या दिवशी चिरणे, कुटणे, भाजणे, तळणे व्यर्ज,या दिवशी उकडलेले पदार्थच केले जातात. मी आदल्या दिवशी भाजून, कुटून, चिरून पदार्थ फ्रिज मधे ठेवते. नागपंचमीला चिरुन ठेवलेल्या भाज्यांची कोशिंबीर, भाज्या फटाफट करता येतात.
पुरणाचे उकड दिंड (Purnache Ukad Dind Recipe In Marathi)
#SSR
नागपंचमीला पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य केला जातो. या दिवशी चिरणे, कुटणे, भाजणे, तळणे व्यर्ज,या दिवशी उकडलेले पदार्थच केले जातात. मी आदल्या दिवशी भाजून, कुटून, चिरून पदार्थ फ्रिज मधे ठेवते. नागपंचमीला चिरुन ठेवलेल्या भाज्यांची कोशिंबीर, भाज्या फटाफट करता येतात.
कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ स्वच्छ धुऊन कुकरला शिजवून घ्यावी. डाळीतील सर्व पाणी निथळून ती पुरण यंत्रातून बारीक वाटून घ्यावी.वाटलेल्या डाळीत गुळ, साखर घालून चांगले एकजीव करून परतून घ्यावे, पुरण आळून आल्यावर त्यात जायफळ पूड वेलची पूड व साजूक तूप घालून चांगले परतून घ्या. पुरण थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे करून घ्यावे.
- 2
नेहमी प्रमाणे कणीक मळून घ्यावी.कणकेची पेढ्या एवढा गोळा करून लाटून घ्यावा. त्यात पुरणाचे सारण भरावे.
- 3
आता कणकेची पारी चारी बाजूने बंद करून तयार दिंड वाफवून घ्या.
- 4
तयार दिंडाचा नैवेद्य देवाला, नागोबाला दाखवून त्याचा प्रसाद घ्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणाचे दिंड (PURNACHE DIND RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 3हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. हा खास करुन नागपंचमीला केला जातो. अशी मान्यता आहे की, या दिवशी चिरणे, कापणे, भाजणे र्वज्य म्हणून उकडलेला नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe marathi)
#Shravanqueenसुप्रियताईंची रेसिपी पाहिल्यावर लहानपणीची आठवण झाली, माझी आजी तेव्हा नागपंचमीला नेहमी पुरणाचे दिंड करायची. तेव्हा आम्ही सगळ्या मुली मिळून नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेहंदी काढायचो, आणि दुसऱ्या दिवशी छान आवरून बांगड्या घालून आजूबाजूच्या सर्व स्त्रिया आणि मुली मिळून खेळ खेळायचो, ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. आता खुप वर्षात दिंड केलेच नव्हते कूकपॅड च्या निमित्ताने करायला मिळाले. Manali Jambhulkar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआमच्याइथे गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीला पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तर चला पाहूया हे कसे बनवले. Pallavi Maudekar Parate -
पुरणाचे दिंड (Puranache Dind Recipe In Marathi)
#SSRआजची माझी 200वी रेसिपी cookpadवर लिहीताना खूप आनंद होत आहे ...तेही श्रावण महिना आणि नागपंचमी या मुहुर्तावर!! 200 रेसिपीजचा टप्पा पार करताना गोडधोड तर काहीतरी व्हायलाच हवे....म्हणून नागपंचमीनिमित्त खास पारंपारिक पुरणाचे दिंड!नागपंचमी हा तमाम महिलांचा सण.भारतीय संस्कृतीत नागाला अनन्यसाधारण महत्व आहे.शंकराच्या गळ्याभोवती हलाहल प्राशन करुन तो रुळला आहे.भगवान विष्णू शेषशय्येवरच आरुढ झालेले आहेत.गणपतीच्या पोटाभोवती नागाचाच विळखा आहे.कालिया नागाचे मर्दन करुन श्रीकृष्ण सुद्धा त्यावरच विराजमान झाला आहे.अशा प्रकारे ही नागदेवता प्रसन्न व्हावी म्हणून पूजा केली जाते.पावसाने आलेली मरगळ थोडीशी दूर व्हावी यासाठी हे सगळे सण उत्साहाने साजरे केले जातात. नागपंचमीला नागाची पूजा करतात.लाह्या-दुधाचा व पुरणाच्या दिंडांचा नैवेद्य दाखवला जातो.नागाच्या वारुळाची पूजा करतात.या दिवशी शेत नांगरत नाहीत.चुलीवर तवा ठेवत नाहीत.पावसाळी हवेला पचनास हलके म्हणून उकडलेले पदार्थ सेवन केले जातात.यासा ठीच पुरणाचे दिंड, पातोळ्या हे पदार्थ आवर्जून करतात.श्रावणातील मंगळागौर,रक्षाबंधन असे व्रतं व सण तनमनाला ताजंतवानं करतात.सासर-माहेरची जवळची माणसं भेटल्याने आनंद द्विगुणित होतो. मनभावन हा श्रावण ... भिजवी तन,भिजवी मन हा श्रावण🐍🌿🌲🌳🌿 Sushama Y. Kulkarni -
पुरणाचे दींड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले त्या मुळे रोज कांही तरी गोड पदार्थ होतोच व तसेच काही पारंपारीक पदार्थ पण आहेत ते त्या त्या सणाला केले जातात जसे की पुरणाचे दिंड ,नागपंचमीला करतात, कोणा कोणा कडे भाजणे चिरणे, किंवा तळणे करत नाहीत तेंव्हा हे उकडीचे दिंड केले जातात. Shobha Deshmukh -
नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड(Nagpanchmi Recipe) (purnache dhinde recipe in marathi)
'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! नागपंचमीच्या निमित्ताने पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर पाहूया नागपंचमी स्पेशल हे पुरणाचे दिंड कसे केले जातात. Prajakta Vidhate -
पुरणाचे दिंड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSRपातळ पुरी मध्ये पुरण भरून त्याचे दिंड केले व ते वाफवले की गरम छान तूप घालून खाल्ले की अतिशय टेस्टी लागतात Charusheela Prabhu -
उकडीचे पुरणाचे दींड (ukadiche purnache dhind recipe in marathi)
# नागपंचमीच्या दिवशी कापणे , भाजणे. चीरणे किंवा जमिनीतुन कांही तोडणे करत नांहीत त्यामुळे तळणे व भाजणे बंद व त्या साठी उकडीचे दींड करतात व तळणे नाही म्हणुन ढोकळा करतात पण ते ढोकळा नेहमी च्या ढोकळ्यावर प्रमाणे नसतात. Shobha Deshmukh -
हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR #हळदीच्या पानातील पुरणाचे दिंड... श्रावण स्पेशल... नागपंचमी ला होणारे पुरणाचे उकडीचे दिंड ... पुरणाचे दिंड हे आपण पोळ्यांसाठी जशी कणीक भिजवतो तशी कणीक भिजवून पोळी लाटून त्यात पुरण भरून केले जातात पण थंड झाल्यानंतर ते थोडे चिवट केव्हा रबरी होतात म्हणून आपण त्याच्यात मोहन घालून खुसखुशीतपणा आणून हे थंड झाल्यावर सुद्धा पुरणाची दिंडी छान लागतील... आणि हे करतांना हळदीच्या पानांमध्ये ठेवल्यामुळे याचा एक सुंदर फ्लेवर आणि सुगंध पण येईल... तसे पुरणाचे दिंड ट्रॅडिशनली पारंपारिक पद्धतीने असेच बनवले जातात बहुतेक नागपंचमीला ज्यांच्याकडे उकडीचे पदार्थ बनतात त्यांच्याकडे पुरणाचे दिंड अवश्य बनवले जातात.. Varsha Deshpande -
पुरणाचे दिंड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी पुरणाचे दिंड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #post2 #cooksnap supriya vartak mohite यांची रेसिपी मी बनवली आहे.श्रावणात नागपंचमीच्या दिवशी बर्याच घरी पुरणाचे दिंड बनवले जातात. त्यादिवशी काही कापत किंवा चिरत नाहीत म्हणून उकडलेले पुरणाचे दिंड बनवतात. आमच्या कडे पातोळ्या बनवतात त्यामुळे मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली. आणि घरी पण सगळ्यांना खूप आवडली. कुकपॅडमुळे मला ही रेसिपी बनवायला मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे Ujwala Rangnekar -
-
दिंड...पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week7#cooksnap Thank You so much Supriya Vartak Mohite for this delicious recipe..आज नागपंचमीचा सण🐍..लेकीबाळींचा सण...👭 माहेरवाशिणींचा सण.खरंतर समस्त स्त्री जातीचा सण....नटण्या मुरडण्याचा सण...स्वतःला pampaer करण्याचा सण😊.. हिरव्यागार श्रावणातला हिरव्या मेंदीचा गर्द केशरी सण...🌿खरंतर संपूर्ण भारतवर्षात साजर्या केल्या जाणार्या बहुतेक सणांनी स्त्री भोवतीच फेर धरलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही..सणांच्या निमित्ताने सतत तनामनाला टवटवी देण्याचं,प्रसन्नता, सकारात्मकता यांचे powepacked package जणू बहाल केलंय आपल्याला आपल्या संस्कृतीने.आणि सण म्हटले की त्याच्या वैशिष्ट्याशी निगडीत खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रुपाने आले...म्हणूनच नागपंचमी म्हटलं की उकडलेले पुरणाचं दिंड हा नैवेद्य दाखवतात घरोघरी...कारणही तसंच आहे या दिवशी चिरणं ,भाजणं,तळणं या गोष्टी स्वयंपाकघरात करत नाहीत.. चला तर मग आपण सुरुवात करु या रेसिपीला... Bhagyashree Lele -
पुरणाचे दिंड (purnache dind recipe in marathi)
#tri #tri_ इनग्रेडिएंट_ रेसिपी #पुरणाचे_दिंडश्रावण मासी हर्ष मानसी 😍हिरवळ दाटे चोहीकडे 🌿🌱☘️क्षणात येते सरसर शिरवे🌧️🌧️क्षणात फिरुनी ऊन पडे🌦️🌦️🌈हसरा लाजरा श्रावण मासाचे गीत गाता गाता निसर्गाबरोबरच आपणही खरचं किती टवटवीत, प्रफुल्लित होतो नं..😍*नेमेचि येतो मग पावसाळा* या उक्तीप्रमाणे पावसाळा जीवन घेऊनच पृथ्वीतलावर अवतरतो...आणि क्षणार्धात सगळे रुपडे पालटतो वसुंधरेचे.🌦️🌧️🌿..सगळीकडे कशी नवचैतन्याची गोड शिरशिरी पसरते..🌱.आणि आपोआपच तन मन आनंदलहरींवर तरंगू लागते..याच मोहमयी श्रावणातला पहिला सण #नागपंचमी🐍..लेकीबाळींचा सण...👭 माहेरवाशिणींचा सण.खरंतर समस्त स्त्री जातीचा सण....नटण्या मुरडण्याचा सण...स्वतःला pampaer करण्याचा सण😊.. हिरव्यागार श्रावणातला हिरव्या मेंदीचा गर्द केशरी सण...🌿खरंतर संपूर्ण भारतवर्षात साजर्या केल्या जाणार्या बहुतेक सणांनी स्त्री भोवतीच फेर धरलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही..सणांच्या निमित्ताने सतत तनामनाला टवटवी देण्याचं,प्रसन्नता, सकारात्मकता यांचे powepacked package जणू बहाल केलंय आपल्याला आपल्या संस्कृतीने..प्रगतीच्या वाटेवर असूनही आपल्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रोवलेली आहेत...उपकार कर्त्याची जाणीव ठेवून त्याला देवत्व बहाल करुन त्यांना पूजणे हे आपले संस्कार...उगाच आपले *जुने जाऊ द्या मरणांलागुनि*हे आपल्या तत्वात बसत नाही...तर आजचा हा #नागपंचमी चा सण शेतकर्यांचा... कृषीप्रधान देश असल्यामुळे पंचमहाभूतांवर अवलंबून...त्याबरोबरच शेतीला साहाय्यभूत ठरणार्या प्राण्यांवर देखील अवलंबून...आणि यातूनच उपकाराची परतफेड करणारा आजचा #सण..🐍🐍 नागोबाची दूध,ज्वारीच्या लाह्या,कणीकसाखरेची सोजी,पुरणाचे दिंड यांचा नैवेद्य दाखवून पूजा करायची... Bhagyashree Lele -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गणेशाचे नाव घेतले की मोदक डोळ्यासमोर येतात. आमचेकडे पुरणाच्या मोदकांचा नैवेद्य महत्त्वाचा मानल्या जातो. त्यामुळे मी आज पुरणाचे तळलेले मोदकाची कृती सांगणार आहे. Varsha Ingole Bele -
पुरणाचे दिंडे (dind recipe in marathi)
#shravanqueen#post2 आज ,सुप्रिया मॅम ने दिंडे ची रेसिपी..छान करून दाखवली .मॅम तुम्ही विठ्ठल कामत सरांच्या सोबत काम केल आहात...हे खुप कौतुकास्पदआहे 👌🙏🍫🥰 ..आज पुरणाचाच स्वयंपाक..सकाळी थोड्या पोळ्या भाजून घेतल्या.उरलेले पुरण फ्रिज मध्ये ठेवले. पण दुपारी दिंडे ची रेसिपी पाहिली..मग मला रहावेना ...संध्याकाळी दिंडे करून घेतले...खाल्ले...संपले🤩🤩 Shubhangee Kumbhar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#मोदकगणेश चतुर्थीला गणपती ला आमच्या कडे पुरणाचा मोदकाचा नैवेद्य असतो. Sandhya Chimurkar -
-
नागपंचमी दिंड (nagpanchami dind recipe in marathi)
#Shravanqueen#रेसपीबुक#week1# माझा आवडता पदार्थ दिंड. नागपंचमी शेतकर्यांसाठी विषेश सण.ह्या दिवशी खणण, चिरण, काहिही करत नाही. घरात वेगवेगळ्या प्रकारांनी नागपंचमी साजरी केली जाते. कोणाकडे तळण नसतं कोणाकडे उकडलेले पदार्थ खातात त्यातलाच एक प्रकार म्हणजे दिंड. Pragati Phatak -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenरेसिपी 2 छान रेसिपी आहे,खूप दिवसांनी केली..लहानपणी खात होते पण आता केली.. Mansi Patwari -
दिंड-शेंगा (dind recipe in marathi)
#shravanqueen#post2#Supriyavartakmohiteमी आज सौ.सुप्रिया मोहिते ह्यांनी आज दाखवल्या प्रमाणे दिंड व आमच्या सिकेपी पद्धती प्रमाणेच्या शेंगा केल्या आहेत.आज नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमी. आज चिरायचे तळायचे नाही हे फार पूर्वी पासून सांगण्यात आले आहेत. अजूनही गावातील लोक ह्या गाष्टी पाळतात तस बघितले ह्या मागील कारण म्हणजे पूर्वी लाईट नव्हते लोक शेतात किंवा परसातील भाजी तोडायची आणि चिरायचे अश्या वेळेस आपल्या कडून काही जीव चिरडले जाऊनये कारण पावसाळ्यात नागाची पिल्ले जन्म घेतात. शेतकरी शेत नांगरताना नागपंचमीला नागाची हत्या होऊ नये हा मुख्य उद्देश असतो. आजच्या काळात आपल्याला हे जमण किती शक्य आहे सांगणे कठीण. आपण ऐवढेच करू शकतो कि आदल्या दिवशी भाजी चिरून ठेऊ शकतो. महाराष्ट्र त नागपंचमीच्या नैवेद्यासाठी पुरणाची दिंडी केली जातात.सीकेपी घराघरात आज नैवेद्यसाठी शेंगा करण्यात येतात. पाटावर चंदनाचे नऊ नाग व नागकुळ काढून त्याची पूजा करतात.दुध साखरेचा नैवेद्य दाखवून नागपंचमी ची कहाणी वाचतात. Nilan Raje -
-
-
-
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueen#cooksnap#दिंड#सुप्रिया मोहिते यांचीही रेसिपी आहे. कुक स्नॅप च्या निमित्ताने पुरणाचे दिंड करण्याचा योग आला. यापूर्वी मी कधीही दिंड् हा प्रकार केला नव्हता. खूप चवदार चविष्ट पदार्थ आहे. Vrunda Shende -
पुरणाचे धोंडफळ (purnache dhondfal recipe in marathi)
पुरणाचे धोंडफळ हे दर ३ वर्षानी येणाऱ्या अधिकमासानिमित्त केले जातात.. ३३ या आकड्यांचा अधिक महिन्यात महत्त्व आहे.. तर हे धोंडफळ सुध्दा ३३ करून देवाला नैवेद्य दाखवला जातो.. Shital Ingale Pardhe -
पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)
#shravanqueen#cook snap ही रेसिपी आमच्या नागपूरकडे त्याला पूर्णा चे फळ असे म्हणतात. हे नागपंचमीला बनविले जाते कारण बरेच बरेच जणांकडे तवा वापरला जात नाही. त्याला पर्याय म्हणून हा एक प्रकार प्रचलित आहे. वाफवलेला असला तरीही अतिशय स्वादिष्ट आहे. थँक्यू मोहिते मॅडम त्यांनी खूप छान समजून सांगितली रेसिपी. सर्वांना ती आवडली घरी देखील . Rohini Deshkar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
आमच्या घरी गणपती पूजनाच्या पहिल्या दिवशी पुरणाचे मोदक करायची प्रथा आहे.आम्ही पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवत असतो.गणपती पूजनाच्या निमित्ताने पुरणाचे मोदक तयार करत आहे. rucha dachewar -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यनागपंचंमीला भाजलेले किंवा तळलेले पदार्थ न बनवता उकडलेले पदार्थ बनवायची पद्धती सागंली भागात आहे.नागपंचंमीला बत्तिस शिराळा या गावी पूर्वी सापांची यात्रा असे. आजही असते मात्र पूर्वी स्पर्धा असत. जास्त उंचीचे साप,जाडीचे साप. लोकं साप गळ्यात घालून मिरवायचे फोटो काढायचे. त्यांची पुजा केली जात असे नैवेद्य म्हणून दिंडे तेही पुरणाचे दाखवले जात. आता तिथे स्पर्धा होत नाहीत.मात्र पुजा केली जाते.तसा हा सण महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो. त्या दिवशी उकडलेले अन्न खाल्ले जाते. Supriya Devkar -
पुरणाचे दिंडे आणि मोदक (purnache dinde ani modak recipe in marathi)
#triआज नागपंचमीचा सण आहे या दिवशी चाकुने काही कापत नाहीत गॅसवर तवा ठेवत नाही. पुरणाची दिंडे नेवैद्य बनवला जातो. महाराष्ट्रामध्ये बत्तीस शिराळा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी जिवंत नाग पकडून यांची पूजा केली जाते. प्रथम अंबाबाईच्या देवळामध्ये नागाला खेळवतात त्याची पूजा करतात आणि मग घरोघरी नागदेवता पुजली जाते. Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या (25)