पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#shravanqueen
#cook snap ही रेसिपी आमच्या नागपूरकडे त्याला पूर्णा चे फळ असे म्हणतात. हे नागपंचमीला बनविले जाते कारण बरेच बरेच जणांकडे तवा वापरला जात नाही. त्याला पर्याय म्हणून हा एक प्रकार प्रचलित आहे. वाफवलेला असला तरीही अतिशय स्वादिष्ट आहे. थँक्यू मोहिते मॅडम त्यांनी खूप छान समजून सांगितली रेसिपी. सर्वांना ती आवडली घरी देखील .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 100 ग्रॅमचणाडाळ
  2. 50 ग्रॅमगूळ
  3. 2 चमचेसाखर
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 1 टीस्पूनकेशर सिरप
  6. 1 वाटीभिजवलेली कणिक

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चण्याची डाळ चार तास भिजत टाकावी. नंतर ती कुकर मधून तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. नंतर चाळणीमध्ये निथळत ठेवावी.

  2. 2

    आताही दादा एका पॅनमध्ये टाकावी. नंतर त्यात गूळ घालावा. साखरही घालावी. मिश्रण चांगले शिजू द्यावे. पावभाजीच्या रगड्याने घोटत रहावे. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची व केशर सिरप घालावे. हे मिश्रण थंड होऊ द्यावे.

  3. 3

    आता कणकेच्या पुरीच्या आकाराच्या लाटाव्यात. त्यात मधोमध पुरणाचा गोळा आडवा ठेवावा. पुरी पहिले बाजूनी फोल्ड करावी. नंतर खालून फोल्ड करून बंद करावी. असे सर्व दींडे तयार करून घ्यावे. वरून थोडे केशर सिरप लावावे.

  4. 4

    आता एका चाळणीवर थोडे तेल लावून त्यावर सर्व दिंड ठेवावे. दहा ते पंधरा मिनिटे करिता वाफवून घ्यावे.

  5. 5

    हे दिंडे गरम गरम सर्व्ह करावे. त्यावर साजूक तूप घालून अथवा तुपाची वाटी सोबत सर्व करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes