लुसलुशीत पुरणपोळी(पुरण न वाटता केलेली)(Puran Poli Recipe In Marathi)

#TGR
चण्याची डाळ, कणिक ,गूळ वापरून केलेली ही लुसलुशीत पुरणपोळी खूप सुंदर होत, पुरण न वाटता केलेली ही पुरणपोळी तुम्हाला नक्कीच आवडेल
लुसलुशीत पुरणपोळी(पुरण न वाटता केलेली)(Puran Poli Recipe In Marathi)
#TGR
चण्याची डाळ, कणिक ,गूळ वापरून केलेली ही लुसलुशीत पुरणपोळी खूप सुंदर होत, पुरण न वाटता केलेली ही पुरणपोळी तुम्हाला नक्कीच आवडेल
कुकिंग सूचना
- 1
डाळ स्वच्छ धुऊन दोन तास भिजत ठेवावी मग त्यामध्ये थोडंसं तेल घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी एक वाटी चणा डाळीला तीन वाटी गरम पाणी घालावं म्हणजे ती छान शिजते
- 2
मग त्यातील पाणी काढून टाकावं व रवी च्या साह्याने डाळ घोटून घ्यावी ही डाळ अतिशय लोण्यासारखी मस्त शिजते मग त्यामध्ये गूळ व साखर घालून गॅसवर ठेवाव सारखं परतत राहा
- 3
मिश्रण घट्ट होऊन त्यात कालथा उभा राहिला म्हणजे आपलं पुरण तयार झालं शेवटी त्यामध्ये वेलची जायफळ पूड घालावी व गॅस बंद करावा
- 4
कणिक चाळणीने चाळून घ्यावी त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालावं चिमूटभर मीठ घालावं हाताने कालवाव लागेल तसं पाणी घालून छान मऊसूत मळून त्याच्यावर तेल लावून झाकून ठेवावे पुरणाचे गोळे करावेत तसेच त्याच्या निम्म्यापेक्षा थोडे मोठे कणकेचे गोळे करावे
- 5
तवा गॅसवर ठेवून एक एक कणकेचा गोळा हाताने त्याची लाटी बनवून त्याच्या पुरणाचा गोळा भरून बंद करावा पोळपाटाला कपडा लावून मग तांदळाचे पीठ घेऊन पोळी लाटावी व गरम तव्यावर छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावी वरतून तूप सोडावे दोन्ही साईडने अशीच खमंग पोळी करावी व दूध आणि तुपाबरोबर खावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hr आज माझी 200 वी रेसिपी पोस्ट करत आहे ....होळी रे होळी पुरणाची पोळी.. असं म्हणत होलिका पुजनासाठी प्रत्येक घरात आवर्जून करतात ती पुरणपोळी ... पुरण पोळी करण्यासाठी आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या आणि सोयीनुसार पद्धती वापरतात पूर्वी पुरणपोळी करण्यासाठी पुरणपात्राचा वापर करायचे पण आता मिक्सरमध्ये बारीक वाटूनही मॅशरने मॅश करून पुरण करतात तसेच पुरणजाळी वापरून पुरण करतात.मी यांत डाळ कुकरमध्ये शिजवून गूळ घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुरण शिजवून जाळीने गाळून केले आहे. Rajashri Deodhar -
पुरणपोळी विदर्भ (puran poli recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रइंडियन क्युजन मास्टरशेफ चैलेंज मध्ये मी महाराष्ट्र निवडून पुरणपोळी बनवलीआहे. होळी म्हणजे पुरणाची पोळी 🤤 पण खरं सांगू का पुरण किंवा पुरणाची पोळी याची डिमांड वर्षभर वेगवेगळ्या सणाला असते .जसा होळीला पूरणपोळी करतात .पोळ्यालाही पुरणपोळी करतात. पुरणाचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी वडा पुरणाचा नैवेद्य असतो.पुरणाची पोळी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरून पुरणपोळी केली जाते . जसं जळगावमध्ये हातावर पोळी करून उलट्या माठावर किंवा घमेल्यावर पुरणपोळी करतात. आणि पातळ असते ती पोळी. पश्चिम महाराष्ट्रातही पुरणपोळी पातळ असते मग त्या पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी दूध किंवा कटाचीआमटी , नाहीतर सरळ तुपाची वाटी घ्यायची. आणि इकडे विदर्भामध्ये पुरणाची पोळी जाड असते. पेढ्या सारखं सोफ्ट पुरण असतं. आणि तुपासोबत ,तूप लावून खायचं.. आता तुम्ही म्हणाल की तूप पुरणपोळी करतानाही टाकला. पुरणपोळी झाल्यावरही तूप टाकलं . कसं असतं ना काही पदार्थांना जे लागतं ते लागतं.तुम्ही प्रमाण कमी-जास्त करू शकता.असे हे पुरणाचे चे प्रकार आणि लाड आहेत. Roshni Moundekar Khapre -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurपुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते.आज गौरीच्या माहेरपणाला खास पुरणपोळीचा थाट ...😊 Deepti Padiyar -
पुरणपोळी रेसिपी (puran poli recipe in marathi)
#hrपुरणपोळीला महाराष्ट्रत महत्त्वाचा गोड खाद्यपदार्थ मानला जातो. होळीच्या दिवशी देवाला पुरणपोळी नैवेद्य दाखवितात तसेच होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते nilam jadhav -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hrमहाराष्ट्रीय सण म्हटले की ते पुरणपोळी शिवाय साजरे होतच नाहीत. पूजा , नैवेद्य दाखवायला पुरण पोळी प्रत्येक घरी करतातच. Priya Lekurwale -
होळी स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr#पुरणपोळी#holiमहाराष्ट्राची प्रमुख सिग्नेचर गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजेच पुरणपोळी वर्षभराची कोणतेही सण वार असो पुरणपोळी लाच सर्वात जास्त मान असतो कुटुंब एकत्र आले तर पुरणपोळीचा घाट असतो आनंद ,प्रेम, तृप्तता अशा सर्व गुणांनी ही पुरणपोळी सर्वांमध्ये गोडवा निर्माण करते महाराष्ट्राचे मुख्य दोन सण पोळा आणि होळी या सणांमध्ये पुरणपोळी ही सर्व घरातून बनवली जाते मला माझ्या लहानपणाची पहिली पुरणपोळी आठवते ती काळा कलर च्या मातीचा खापरे वर तयार केलेली खापर पुरणपोळी माझ्या गावात मी लहानपणापासून खाल्लेली आहे आमच्या घरात खापर पुरण पोळी बनवायला बऱ्याच बायका यायच्या इतक्या साऱ्या पुरणपोळ्या बनवायच्या आणि आमच्याकडे बरेच पाहुणे जेवायला यायचे त्यामुळे मी जर खाल्लेली पहिली पोळी खाल्ली असेल तर ती खापर पोळी आहे. आजही आई आमच्यासाठी पोळी बोलून बनवून घेते. पोळी बरोबर भरपूर तूप कटाची आमटी, कुरडया ,भजे असे मेनू असायचाच मला ही लहानपणापासून जे बघितले त्याची सवय लागली आहे म्हणून मी हेच पदार्थ सणावाराला बनवते बऱ्याच भागात तुरीच्या डाळीपासून पुरण बनवले जाते मी बनवलेली पुरणपोळी चे पुरण मी ज्या गाळणीतून पुरण घासून काढले ते अधिक मासात दिलेले वान आहे तिने Chetana Bhojak -
गुजराती स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr# पुरणपोळी#holi specialHappy holi...... सर्वांनाआली रे आली होळी आली.. होळी रे होळी पुरणाची पोळी.... म्हणत म्हणत आज पुरणाची पोळी बनवली..😇 होळीच्या दिवशी पुरणपोळी ही सर्वत्र बनवली जात असते ...पुरणपोळी ही महाराष्ट्रात विविध प्रकारांनी बनवली जाते. त्यातूनच मिक्स मॅच करून मी गुजराती लोक बनवत असतात ती रेसीपी आज मी बनवली आज पुरण पोळी बनवताना पप्पांची खूप आठवण आली..miss u pappa.😥तसेच मीही माझ्या मम्मी कडून शिकलेली पुरणपोळी आज बनवली आणि ती अप्रतिम अशी बनली....😋... मस्त मऊ लुसलुशीत तुपाने पूर्ण लजपत, गोळ... नुसती पुरणपोळी खाऊन खुश...... माझे मुलं...😊चला तर मग कशी मी बनवली ते पाहूया... Gital Haria -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
आज अक्षयतृतीया. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या कडे स्पेशल पुरणपोळी आमरस, कटाची आमटी, भजी, वरणभात,पापड, कुरडया असा साग्रसंगीत बेत असतो. आज मी पुरण पोळ्या कशा करतात हे दाखवते. Vrishali Potdar-More -
पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये आषाढी एकादशीचा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून माझ्या घरी सर्वांना आवडते म्हणून पुरण पोळी आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साखर पुरणपोळी (sakhar puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी रेसिपी पुरणपोळी ही महाराष्ट्रातील पॉप्युलर स्वीट डिश आहे. मी ह्यात गुळाऐवजी साखरेचा वापर करून बनवले आहे .खूप मस्त ,सॉफ्ट बनली. Najnin Khan -
पुरण पोळी लुसलुशीत (Puranpoli recipe in marathi)
#HSR#Happy Holi special खास महणजे मी मऊ लुसलुशीत पुरण पोळी बनवले आहे. दुधा सोबत किंव्हा तूप, कट्टा ची आमटी सोबत खायला फार छान लागते. Varsha S M -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी माझी पुरणपोळी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#mfr# पुरणपोळी त्यांच्या वरून तूप मला खूप आवडते म्हणून आज पुरणपोळी बनवली आहे 😋😋👌 Rajashree Yele -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन पारंपारिक पुरणपोळीची रेसिपी शेअर करत आहे.काहीजण मुगडाळ वापरून सुद्धा ही पुरणपोळी बनवू शकतात.माझी आजी नेहमी म्हणायची की पुरण घातले की लगेचच त्याचे कणिक मळून ठेवावे म्हणजे कणिक छान मुरले की पुरणपोळ्या सुद्धा खूप सुंदर बनतात.तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
हटके सत्तू पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#hr- होळी साजरी दर वर्षी करतो,पण पुरण पोळी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.तो यशस्वी झाला आहे,कारण अतिशय सुंदर, चविष्ट पोळी तयार केली त्याचा आस्वादही घेतला. Shital Patil -
सुग्रास पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
महाराष्ट्र मध्ये सर्व सणा मध्ये आणि जेवणात पुरणपोळी हा आपल्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय. तसेही सणासुदीला, नैवेद्याच्या स्वयंपाकात आपल्याकडे पुरण असतेच. त्या पुरणाची पोळी होऊन समोर येते, तेव्हा चेहऱ्यावर आनंद पसरतो. ही पुरणपोळी किंवा पुरणापासून गेलेला गोड पदार्थ देशातही विविध ठिकाणी होतो. नावे वेगळी, करण्याची पद्धत वेगळी.तर अशी ही आपली सुग्रास पुरणपोळी बघू यात.. :-) Anjita Mahajan -
नागपुरी पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr पुरणपोळी ला पोळ्यांची महाराणी म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही त्यातून नागपुरी पुरणपोळी तर विचारायलाच नको.भरपूर पुरण भरलेली,म ऊसुत,लूसलुशीत, खरपूस भाजलेली, आकाराने मोठी आणि जाड, तोंडात टाकताच विरघळणारी, होळीला प्रत्येक घरी होणारी!!माझ्या द्रुष्टीने माझी हातखंडा रेसिपी!वरची पारी पातळ हवी आणि सोबत घरच्या रवाळ, खमंग तुपाची वाटी!अवघं स्वर्ग सुख!!!! Pragati Hakim -
डाळव्याची पुरणपोळी (Dalvyachi Puran Poli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#माझी आवडती रेसिपी पुरणपोळी मला खुप आवडते..आज दसरा आहे आणि आमच्याकडे पुरणपोळी चा नैवेद्य असतो..आज मी वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवली आहे.. डाळ न शिजवता डाळव्याची पुरणपोळी बनवली आहे.. मस्त मऊ लुसलुशीत होते.. लता धानापुने -
पुरणपोळी कढी (Puranpoli kadhi recipe in marathi)
#Hsr#पुरणपोळी#कढीहोळी उत्सव निमित्त तयार केलेली पुरणपोळी आणि बरोबर कढी चे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतेपुरन पोळी बरोबर कढीचे कॉम्बिनेशन छान लागते गुजराती कम्युनिटी मध्ये सर्वात जास्त पुरण पोळी बरोबर कढी केली जाते. खायला चविष्ट लागते हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करून बघारेसिपी तून नक्कीच बघा पुरणपोळी आणि कढी Chetana Bhojak -
तेलची पुरणपोळी (तेलावरची पोळी) (telavarchi puran poli recipe in marathi)
#पुरणपोळीपुरणपोळी तेही तेलावर लाटणे हे फार स्किलचे काम आहे.पुरण अगदी मऊसर आणि कणिक ही एकदम मऊसर असावी लागते. तेलावर हलक्या हाताने लाटावी लागते. Supriya Devkar -
पळसाच्या फुलांची पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr#पळसाच्या फुलांची पुरणपोळीरोज सकाळी फिरायला जात असताना आमच्या घराजवळ पळसाची झाडे आहे. या दिवसांमध्ये पळसाच्या फुलांचा नुसता सडा पडलेला असतो. ती फुले वेचून आम्ही घरी आणून वाळवून त्याची पावडर केली. त्याचे औषधी गुण जाणून याचा उपयोग पुरणाच्या पोळी मध्ये करून बघितला. पुरणाची पोळी चा सुंदर झालीच रंग ही सुंदर आला आणि त्यातले औषधी गुणही पोटात गेले. ही अफलातून पुरणपोळी होळीच्या दिवशी आधी योग्य वेळी योग्य दिवशी ही आयडीया सुचली. खूप सुंदर आहे आणि खूप खूप उपयोगी आहे. Rohini Deshkar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurआज गौरी चे आगमन आजच्या दिवशी आमच्या कडे गौरी साठी पुरणपोळी चा नैवेद्य असतो ही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुकआंब्याचा सिझन आहे म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या आंब्यापासून तयार होणारे पदार्थ बनवून पाहत आहे पण आमरस आणि पुरणपोळी नाही बनवली तर आंबा अपूर्ण वाटतो.आंब्याच्या दिवसातली हि माझी आवडती रेसिपी आहे 😋😋 Deveshri Bagul -
पुरणपोळी आइस्क्रीम
#होळी पारंपारिक पुरणपोळीचे साहित्य वापरून आधुनिकतेची जोड देऊन फ्युजन रेसिपी केली आहे पुरणपोळी आइस्क्रीम. Preeti V. Salvi -
पुरणपोळी
#पुरणपोळी ... होळी रे होळीहोळी म्हटली की साहजिकच पुरणपोळी आलीच. सगळ्यांकडे थोड्या फार फरकाने सारखीच रेसिपी असली, तरी पुरणपोळी हा पदार्थ तसा निगुतीने करायचा. मऊसूत पिठात खमंग गोड पुरण भरून हलक्या हाताने पोळी न फाटू देता लाटणे यातच कसब आहेच पण त्यांनतर ती पोळी तूप घालून खमंग भाजताना ही त्या अन्नपूर्णे चा खरा कस लागतो... आणि मग खवय्यांच्या ताटात पडते ती गोड लुसलुशीत पुरणपोळी... मग ती तुपाबरोबर खा, दुधाबरोबर खा किंवा तिखट कटा बरोबर.... ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा😋 Minal Kudu -
पुरणपोळी प्रीमिक्स (puran poli premix recipe in marathi)
पुरणपोळी करताना पुरण जर तयार असेल तर पुरणपोळ्या भराभर होतात. म्हणून मी ही प्रिमिक्सचा प्रयोग करुन पाहीला आणि त्याच्या पोळ्या छानच झाल्या अगदी ताज्या पुरणा सारख्या. आता प्रिमीक्स करुन ठेवा आणि जेव्हा इच्छा होइल पोळ्या तयार. हे प्रिमीक्स ४/ ६ महिने फ्रिजमध्ये छान राहते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व.आज संकष्टी मग काही तरी नैवेद्य हवा मग आज बाप्पा साठी पुरणपोळी केली. Hema Wane -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr*नैवेद्याची राणी**पुरणाची पोळी*🥳😀😋😋 पुरणासारखा पवित्र मंगलकारक नैवेद्य नाही. ताट भरून,तोंड भरून,पोट भरून.🥰😋.… अतिशय मऊ लुसलुशीत सोनेरी रंगावर लोणकढ तुप सोडून भाजलेली पोळी ज्याच्या पानात तव्यावरून विराजमान होते,त्या ताटात पुन्हा तिच्यावर सैल हाताने तुपाचा अभिषेक होतो व ती तुपात बुडल्याने तांबूस पिवळसर चकचकीत आतील तांबूसपुरण दाखवत ती देखणी दिसते व जणू मी तयार आहे तुमची रसना तृप्त करायला😀😀 अशी सांगते. तुम्हा सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा😀😀🙏🙏 Sapna Sawaji -
पारंपरिक पुरणपोळी (paramparik puran poli recipe in marathi)
#hr#puranpoliहोळी रे होळी, पुरणाची पोळी...होळीला पुरणपोळीचा नैवेद्य हा हवाच. घरोघरी पुरणपोळ्यांचा सुवास दरवळू लागतो. पदार्थ जरी तोच असला तरी प्रत्येकाची बनवण्याची रीत वेगवेगळी असते. आज मी घेऊन आले आहे थोडीशी वेगळी पण पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी जी मऊ, लुसलुशीत,तोंडात टाकताच लगेच विरघळणारी. मला ही रेसिपी सासूबाईंनी शिकवली. त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवली.कदाचित त्यांनाही त्यांच्या सासूबाईंनी शिकवली असेल. चला तर मग पाहूया पारंपरिक पुरणपोळी रेसिपी. Shital Muranjan -
More Recipes
- तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
- तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
- भोगीची भाजी. संक्रांत स्पेशल (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
- सात्विक गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
- संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
टिप्पण्या