पाकातले चिरोटे (Pakatle Chirote Recipe In Marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#DDR
#करायला सोप्पे ,खरच करून बघा खुपच छान होतात.

पाकातले चिरोटे (Pakatle Chirote Recipe In Marathi)

#DDR
#करायला सोप्पे ,खरच करून बघा खुपच छान होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1.5 टेबलस्पूनतेल
  3. 1/8टिस्पून मीठ
  4. 1/2 कपदुध
  5. साट्यासाठी
  6. 2 टेबलस्पूनतुप
  7. 2/3 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  8. पाकासाठी
  9. 1 कपसाखर
  10. 1/2 कपपाणी
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    बारीक रवा घेऊन त्यात मीठव तुप घाला नी रव्याला व्यवस्थित लावून घ्या नी नंतर दुध घालून सैलसर रवा भिजवून घ्या.पीठाचा गोळा झाकून दिड तास बाजूला ठेवा.

  2. 2

    साट करण्यासाठी तुप एका वाटी मधे घेऊन फेटून घ्या म्हणजे हलके होईल नंतर त्यात काॅर्नफ्लोवर घाला नी परत फेटून घ्या.हे साट तयार झाले.

  3. 3

    एका कढईत 1 कप साखर नी त्याच्य निम्मे 1/2 कप पाणी घाला नी उकळत ठेवा साखर विरघळली की 5/6 मिनीटात 1 तारी पाक तयार होतो अजून एक मिनीटे उकळला की गॅस बंद करा.शक्यतो पाक कच्चा राहू देऊ नका नाहीतर चिरोटे नरम पडतात.हवी असेल तर वेलचीपूड घाला.

  4. 4

    आता झाकून ठेवलेल्या पीठाचे सहा गोळे करा चार गोळे फुड प्रोसेसर ला फिरवा नी दोन गोळ्यात खायचा रंग घाला नी तोही फुड प्रोसेसर ला फिरवा.सहा चपात्या लाटून घ्या.

  5. 5

    आता पहिली चपाती घेऊन त्याला साटे लावा,त्यावर रंगीत चपाती ठेवा साटे लावा तिसरी चपाती ठेवा नी थोडे अलगद लाटणे फिरवा परत सारे लावा नी व्यवस्थित गुंडाळी करा थोडे हाताने रोड करून घ्या.

  6. 6

    आता पातळ लाट्या सुरीने कापून घ्या नी झाकून ठेवा.एक एक लाटी थोडीशी लाटा.तेल गरम झालेले आहे त्यात चिरोटे मंद आचेवर तळून घ्या.

  7. 7

    गरम चिरोटे पाकात 2/3 मिनीटे ठेवा नी काढून घ्या.असे सर्व चिरोटे तळून पाकात घालून बाजूला काढून ठेवा.

  8. 8

    खुसखुशीत पाकातले चिरोटे तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes