खुसखुशीत पाकातले चिरोटे

Vrushali Korde
Vrushali Korde @Vrushali21
Thane

#ckps

विविधतेने नटलेली अशी आपली भारतीय खाद्यसंस्कृती ! प्रत्येक सणासुदीला आपण काहींना काही गोड बनवतच असतो. असाच एक अतिशय खुसखुशीत, दिसायला सुंदर आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे चिरोटे...ज्यावेळी नाजूक हाताने लाटलेला चिरोटा अलगद गरम तुपात सोडला जातो आणि मग एक एक पापुद्रे उलगडू लागतात त्यावेळी जो अपूर्व आनन्द मिळतो तो काय वर्णावा...चला तर मग रेसिपी लिहून घेताय ना....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 minutes
4-5 सर्व्हिंग्ज
  1. मैदा (१ १/२ वाटी)
  2. तूप (२ १/२टेबलस्पून )
  3. कॉर्नफ्लोअर (5-6टेबलस्पून )
  4. मीठ (चिमूटभर)
  5. तूप/ तेल (तळण्यासाठी)
  6. फूड कलर (कोणताही आवडीचा रंग घ्यावा)
  7. पाकासाठी-
  8. साखर (१०टेबलस्पून )
  9. पाणी (३-४टेबलस्पून )

कुकिंग सूचना

25-30 minutes
  1. 1

    साखर व पाणी एकत्र करावे. साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यावी व गॅस बंद करून पाक बाजूला ठेवावा.
    मग मैद्यामध्ये एक चमचा तूप व मीठ घालून मळावे. १/२ तास हा गोळा बाजूला ठेवावा.
    एका भांड्यात १ १/२ चमचा तूप घालून, त्यात थोडा थोडा कॉर्नफ्लोअर घालून सारण तयार करावे.
    मग मळलेल्या गोळ्याचे ६ गोळे करून, प्रत्येकाच्या पातळ पोळ्या लाटून बाजूला ठेवाव्यात.
    आता एक पोळी घ्यावी व त्यावर तूप आणि कॉर्नफ्लोवरचे सारण लावून, त्यावर दुसरी पोळी ठेवावी.

  2. 2

    असं करत प्रत्येक पोळीच्या मध्ये सारण व रंग घालून, पोळ्या एकावर एक ठेवाव्यात व दाबून घ्याव्यात.त्याचा एक रोल बनवावा व सुरीने १२ -१५ तुकडे कापून,लाटून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrushali Korde
Vrushali Korde @Vrushali21
रोजी
Thane
Secret ingredient for cooking is - love
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes