पुरण पोळी

HR1 होळी पौर्णिमा रेसिपीज साठी मी आज पुरण पोळी, कटाची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
पुरण पोळी
HR1 होळी पौर्णिमा रेसिपीज साठी मी आज पुरण पोळी, कटाची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये 500 ग्रॅम मैदा, 250 ग्रॅम गव्ह्याचे पीठ, 250 ग्रॅम बारीक रवा (पाण्यात भिजवून) मग मैदा आणि गव्हाच्या पिठात मिक्स करून, त्यात चवीनुसार मीठ घालून पिठ चांगले मळून घेतले. आणि त्यावर तेल घालून घेतले.
- 2
नंतर एका मोठ्या पातेल्यात 1 किलो चणाडाळ घेऊन ती स्वच्छ पाण्याने 3-4
वेळा धुऊन घेतली. आणि ती शिजवून घेतली. - 3
मग शिजवून घेतलेली डाळ चाळणीवर गाळून घेतली. आणि एका मोठ्या पातेल्यात शिजवून घेतलेली डाळ, 500 ग्रॅम साखर, 500 ग्रॅम गूळ, 1 चमचा वेलची पावडर व 1/2 चमचा जायफळ पावडर घालून, ते सर्व साहित्य एकत्र करून, मंद गॅसवर शिजवून घेतले.
- 4
नंतर शिजवून घेतलेले पुरण थंड झाल्यावर पुरण, पुरण यत्रातून एकदम बारीक वाटून घेतले.
- 5
आता मळलेल्या पिठाचे गोळे करून, त्यात पुरणाचा गोळा भरून, त्याची पोळी लाटून घेतली. आणि गरम तव्यावर, दोन्ही बाजूने पोळी चांगली भाजून घेतली. आणि दोन्ही बाजूने भरपूर तूप लावून खरपूस भाजून घेतली.
- 6
आता सर्व्ह करण्यासाठी, गरमा गरम आणि देवाला दाखविण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार आहे. पुरण पोळी बरोबरच भात, कटाची आमटी, बटाट्याची भाजी अशे नैवेद्याचे ताट तयार आहे.
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या