लालमाठची भाजी

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650

#पालेभाजी #goldenapron3
कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला .

लालमाठची भाजी

#पालेभाजी #goldenapron3
कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
  1. लहान जुडी लालमाठ भाजी
  2. मोठे कांदे बारीक चिरून
  3. ३-४ हिरव्या मिरच्या
  4. १/२ वाटी किसलेलं ओलं खोबरं
  5. १ टीस्पून मीठ
  6. २ टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कोवळी लालमाठची जुडी स्वच्छ करून त्यातील पाने आणि कोवळे देठ घ्यावेत. मग तर स्वच्छ धुवून चाळणीत ठेवून पाणी निथळून जाऊ द्यावे

  2. 2

    आता भाजी बारीक चिरून घ्यावी आणि इतर साहित्य सुद्धा तयार ठेवावे फोडणीसाठी.

  3. 3

    आता कढईत तेल तापले कि त्यात मिरची व कांदा घालून त्यावर मीठ घालून परतावे.

  4. 4

    कांदा गुलाबी रंगावर मऊसर झाला कि त्यात चिरलेली लालमाठाची भाजी घालून ढवळून घ्यावे.

  5. 5

    आता सतत २-३ मिनिट परतून त्यावर ५ मिनिट झाकण ठेवून एक वाफ आणू द्यावी

  6. 6

    आता झाकण काढून भाजी पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित ढवळून गॅस बंद करावा आणि किसलेलं खोबरं घालून भाजी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes