लाल माठाची भाजी (Laal Mathachi Bhaji Recipe In Marathi)

#GR2
पालेभाज्या खूप प्रकारच्या असतात काही हिरव्यागार तर काही लाल चटक लाल मठाची भाजी शेतामध्येही सुंदर दिसते त्याचप्रमाणे शिजवून पाण्यात आल्यानंतरही ती सुंदर दिसते चव तर अप्रतिम असतेच शिवाय शरीराला पोषक ही असते.
चला तर आज बघूया ही देखणी, भाजी कशी करावी.
लाल माठाची भाजी (Laal Mathachi Bhaji Recipe In Marathi)
#GR2
पालेभाज्या खूप प्रकारच्या असतात काही हिरव्यागार तर काही लाल चटक लाल मठाची भाजी शेतामध्येही सुंदर दिसते त्याचप्रमाणे शिजवून पाण्यात आल्यानंतरही ती सुंदर दिसते चव तर अप्रतिम असतेच शिवाय शरीराला पोषक ही असते.
चला तर आज बघूया ही देखणी, भाजी कशी करावी.
कुकिंग सूचना
- 1
लाल माठाची जुडी कवळीआणि ताजी बघून आणावी. नीट निवडावी, स्वच्छ धुवावी आणि बारीक चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे कांदा बारीक चिरून, मिरच्या उभ्या चिरून, लसूण ठेचून घ्यावा.
- 2
नंतर कढईत फोडणीसाठी तेल तापल्यावर त्यात लसूण तांबूस परतून घ्यावा मग उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या परतून त्यावर कांदा घालावा, गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यात हळद आणि बारीक चिरलेली माठाची भाजी मंद आचेवर पाच मिनिटं झाकून ठेवावी.
- 3
भाजी कवळी असल्यामुळे लगेच शिजते नंतर त्यात साखर आणि ओलं खोबरं घालून नीट ढवळून दोन मिनिटं झाकून ठेवावी आणि नंतर कुठल्याही भाकरी बरोबर किंवा डाळ भाताबरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी भाजी "लाल माठाची भाजी" ही भाजी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.. आमच्या कडे लाल माठाची भाजी म्हणतात.. लता धानापुने -
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr पावसाळी रानभाज्या :पाऊस पडला की रंगीबेरंगी रानभाज्या हळूहळू बाजारात येऊ लागतात.इकडे पुण्याकडे तशा रानभाज्या कमीच!जितक्या आदिवासी डोंगराळ भागात असतात त्यापेक्षा कमीच.म्हणजे डहाणू, वस ई,पालघर,वाडा,जव्हार ....या ठिकाणी सहज मिळतात.त्यातल्या त्यात मिळणाऱ्या रानभाज्या म्हणजे पोकळा,करटुली,राजगीरा, तांदळजा,हिरवा किंवा लाल माठ,केनीकुर्डु,घोळ,अंबाडी,हादग्याची फुले अशाच.आपण बाराही महिने खातो त्या भाज्या म्हणजे मेथी,शेपू,पालक,मुळा,अळु,चुका या भाज्या.ऐन पावसाळ्यातील या भाज्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.पावसाळ्यात भूक मंदावते त्यामुळे पचायला हलक्या अशा भाज्या वर्षातून 1-2महिने तरी खायलाच हव्यात.मुख्य म्हणजे या रानभाज्या कृमीनाशक व पचनशक्ती सुधारणाऱ्या असतात.श्रावण भाद्रपदात व खासकरुन ऋषीपंचमीला या भाज्या तसंच पितृपक्षात आवर्जून केल्या जातात. आज मी केलेली लाल माठाची भाजीही रानभाजी प्रकारातलीच.रक्तवाढीला उपयुक्त. नैसर्गिक हिमोग्लोबिनचा स्त्रोत असलेली.फायबरयुक्त.फारशी मुळापासून न उपटता वरवरचे देठ काढून याची जुडी करतात.पाने चरचरीत असतात.कोवळी भाजी खायला रुचकर लागते.यातील देठांचेही खूप महत्व आहारात आहे.अळुच्या देठांसारखे सोलून या देठांची देठी किंवा भरित किंवा भाजीत चिरुनही छान लागते.हिरव्या ऋतुत येणाऱ्या या रानभाज्या आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात.नवीन उर्जा देतात.आदिवासी, दुर्गम भागात येणाऱ्या या रानभाज्या तिथे रहाणाऱ्या लोकांसाठी वरदानच आहेत तसंच त्यांच्या चरितार्थाचेही साधन आहे. Sushama Y. Kulkarni -
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
लाल डिंगरी ची भाजी (Lal Dingrichi Bhaji Recipe In Marathi)
भाजीच्या मार्केटमध्ये आपण फिरतो तेव्हा आपल्याला माहिती नसलेल्या अशा भाज्या सुद्धा दिसतात आणि आपल्या कुक पॅडच्या सख्या नेहमीच त्याच्या शोधात असतात, की नवीन काहीतरी दिसेल. अर्थात ही भाजी माझ्यासाठी नवीन होती ,पण मी भाजीवालीने जशी सांगितली तशी बनवली, त्याचप्रमाणे केली, त्यामुळे खरंतर ही रेसिपी त्या भाजीवालीची, पण भाजी झाल्यावर मात्र खूप सुंदर वेगळ्या चवीची लागली, तीच आज आपल्यापुढे सादर करत आहे. Anushri Pai -
चवळीच्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कवळ्या लुसलुशीत चवळीच्या शेंगा बाजारात आल्या की चटकन त्याची भाजी करावीशी वाटते. डब्यात देण्यासाठी अशी ही सुकी भाजी आज आपण बघूया. Anushri Pai -
साधी हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
हिरव्या पालेभाज्या आणि त्याचे महत्व आपल्याला माहीतच आहेत, रोजच्या दैनंदिन आहारात, पालेभाज्यांचे सेवन करायलाच हवे... माझ्या मुलाला पालेभाज्या फारचं आवडतात... आणि त्या निमित्ताने माझ्या घरी नेहमीच पालेभाज्या खाल्ल्या जातात... Shital Siddhesh Raut -
पौष्टिक लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#ngnrलाल माठाच्या भाजीमध्ये, अ जीवनसत्त्व, बीटा कॅरोटीन हे गुणधर्म असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य, पोटाचे आरोग्य चांगले राहते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी लाल भाजी म्हणजेच माठाची भाजी खाणे उपयुक्त आहे.पाहूयात कांदा लसूण विरहित माठाची भाजी..😊 Deepti Padiyar -
लाल माठाची भाजी
भरपूर व्हिटॅमिन ,आयर्न ने युक्त अशी भाजी...भाकरीसोबत तर अप्रतिम लागते.... Preeti V. Salvi -
-
लाल माठाची भाजीची रेसिपी (कोकणी रेसिपी) (laal methachi bhajichi recipe in marathi)
#KS1या भाजीला माठाचीभाजी/चवळी माठ म्हणतात तिच्या रंगामुळे या भाजीला लाल माठ म्हणतात. ही भाजी हिरव्या पानाची पण असते ही भाजी खूप पौष्टिक आहे.महाराष्ट्रात कोकण भागात ही भाजी जास्त प्रमाणात केली जातो .वजन कमी होण्यासही भाजी उपयुक्त आहे.आहे.चला तर पाहूयात या भाजीची रेसिपी. nilam jadhav -
लाल माठाची भाजी
#पहिलीरेसिपीपोस्ट तिसरीलाल माठाची भाजी ही झटपट, कमी साहित्यात होणारी अशी लोहवर्धक लाल माठाची भाजी, ही भाजी औषधी गुणधर्म असून चवीला ही खूप छान होते, चपाती, भाकरी, अगदी भाता बरोबर ही छान लागते. Shilpa Wani -
-
हिरव्या माठाची भाजी
हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या भाज्या उन्हाळ्याकडे थोड्या कमी व्हायला लागतात आणि म्हणून जसा जसा उन्हाळा जवळ येऊ लागतो तशी पालेभाज्यांची ओढ वाढू लागते. आज आपण पाहूया हिरव्या माठाची पालेभाजी. Anushri Pai -
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
नमस्कार सखीमेथीची भाजी म्हणजे प्रतेक महाराष्ट्रीयन स्त्री चा जीव की प्राण ,या शिवाय देवीचा नेवेद्य पूर्ण होत नाही .ही भाजी कितीही साधी सिंपल केली तरी चवीला अगदी चविष्ट लागते .काही स्त्रिया तर याची कच्ची पाने सुध्दा आवडीने खातात .चला तर मग आजच्या रेसिपी ला सुरुवात करुयात . Adv Kirti Sonavane -
फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 फरसबी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वांना आवडते आणि खूप डिशमध्ये हिचा उपयोग करता येतो. व्हेज कुर्मा, पुलाव, कोशिंबीर, सुकी भाजी, कटलेट्स ,टिक्की सर्व ठिकाणी चालते .अशी ही एव्हरग्रीन भाजी आज आपण अगदी कमी साहित्यात पण तितकीच चविष्ट अशी करून बघूया. ही रेसिपी मंगलोरी आहे Anushri Pai -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#gur#श्रावण_शेफ _चॅलेंजमाझ्या माहेरी गणपतीच्या दिवशी नैवेद्याच्या ताटामध्ये हिरव्या माठाची भाजी ही हमखास असतेच. गावाकडे श्रावणामध्ये घरासमोर आवारामध्ये हिरव्या माठाची भाजी हि मोठ्या प्रमाणावर येते. हिरव्या माठाची भाजी ही बनायला जितकी झटपट बनते तितकीच चवीला सुंदर आणि खाण्यासाठी पौष्टिक असते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
हिरव्या माठाची फ्राय भाजी (Hirvya Mathachi Fry Bhaaji Recipe In Marathi)
उन्हाळ्यासाठी ही भाजी अतिशय टेस्टी व पोटासाठी थंड असते नुसती कांद्यावर फ्राय केली की भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते Charusheela Prabhu -
पौष्टिक माठाची भाजी (mathachi bhaji recipe in marathi)
संपूर्ण माठाची एक जुडी २५ ते ३० लोहाच्या टॉनिक गोळ्यांच्या बरोबरीचे नैसर्गिक लोह देते, जे बाळंतिणीला फार गरजेचे असते. माठ हा लोहयुक्त व रक्त वर्धक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते.चला तर मग पाहूयात अगदी सोपी आणि झटपट होणारी पौष्टिक भाजी. Deepti Padiyar -
हिरव्या माठाची भाजी (Hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#MLRताजी हिरव्या माठाची फ्राय भाजी व त्याबरोबर चपाती ताक एखादं फळ असं उन्हाळ्यात खाल्ले की फार बरं वाटतं Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लँनर #शनिवार की वर्ड-- भोपळा भाजी भोपळा म्हटला की माझ्यासमोर दुधीभोपळा ऐवजी नेहमी लाल भोपळाच येतो.. याला कारण की आपली लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट. या गोष्टीने मनात घर करून ठेवले आहे .गोष्टी मधली म्हातारी लेकीकडे जाऊन तूप रोटी खाऊन चांगली जाडजूड होऊन परत यायला निघते तिच मुळी लाल भोपळ्यात बसून.. तर अशा ह्या लाल भोपळ्याने म्हातारीचे वाघ आणि कोल्ह्यापासून रक्षण केले होते. आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारणे वजन कमी करणे ते डायबिटीस लो बीपी कॅन्सर यासारख्या असाध्य रोगांंपासून म्हणजेच या जंगली भयानक आजारांपासून लाल भोपळा आपले देखील रक्षण करतो. त्यामुळे लाल भोपळा आपण खाणे मस्टच. कोणी लाल भोपळ्याची भाजी करून खा आणि सांबार करा कोणी भरीत करा कोणी घारगे करा कोणी खीर करा पण काहीतरी करून लाल भोपळा पोटात जाऊद्या आणि मुलांना पण खायला द्या कारण मुलांना खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत नाहीतर मोठेपणी ते खवय्यै कसे होणार .आपल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद कसा लुटणार यासाठी लहान वयातच खाद्य संस्कार होणे महत्त्वाचे आहे. चवीनं खाणार त्याला देव देणार असं म्हटलेलं आहे ..म्हणून पु लं म्हणतात तसे खाण्यासाठी खाणारा तो खवैय्या कसला... कारण शेवटी खाण्यासाठी जन्म आपुला आणि या खाण्यावर शतदा प्रेम करावे अशाच एक एक खमंग पाककृती..चला तर आपण आज लाल भोपळ्याची मेथीदाणा घालून केलेली खमंग भाजी पाहूया आणि खाऊ या..😋 Bhagyashree Lele -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनरकूकपॅड कडून मिळालेल्या डिनर प्लॅनप्रमाणे लाल भोपळ्याची भाजी तयार केली. लाल भोपळा म्हटला म्हणजे माझ्यासाठी फक्त छान छान गोष्टी तले 'चाल रे भोपळ्या टुणुक टुणुक आजीची गोष्ट' माझ्या आठवणीत आहे माझ्या लहानपणापासून मी कधीच लाल भोपळ्याची भाजी खाल्ली नाही म्हणजे ते आमच्या खाद्य-संस्कृती ती भाजी खात नाही असे काहीतरी आहे मी बऱ्याच विचारायचा प्रयत्नही केला पण काही कळलेच नाही का खात नाही त्याचे शास्त्र काही माहीतच नाही इतके सांगितले गेले की आपण ती भाजी खात नाही. लग्नानंतर बऱ्याच वर्षानंतर ज्या ठिकाणी मी राहते इथे तर खूपच माझ्या आवडीप्रमाणे मला वातावरण मिळाले मुंबईत खाद्यसंस्कृती म्हणजे आपण बऱ्याच लोकांच्या खाद्यसंस्कृतीत बऱ्याच वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतो त्यामुळे त्यांची खाद्यसंस्कृती आणि खाण्याचे पदार्थ ही करून बघायला खायला मिळतात. हे आवर्जून सांगायचीनंतर कद्दू, भोपळा ,डांगर ,कोळा ,पंपकीन अशी बरीच नावे कळली जेव्हा टेस्ट केला तेव्हा मी माझ्या आहारात त्याचा समावेश केला आणि आता बऱ्याचदा मी बनवूनही खाते आजही मी माझ्यासाठी बनवले आहेफोडणीत मेथीदाना टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान जबरदस येतो जेव्हा फोडणी देतो त्याचा सुगंधित सुवास सगळीकडे पसरतो. या भाजीबरोबर वरण भात हवाच अजून छान लागतो. रेस Chetana Bhojak -
गुणकारक हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#msr जंगलातली खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीतून एक भाजी हिरवा माठ..… दोन प्रकारचे माठ असतात एक लाल माठ व एक हिरवा माठ . ही पालेभाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानात उगवते व तांदुळजा प्रमाणेच तिचाही वापर करतात याच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते भरपूर प्रमाणात आयर्न मिळते विटामिन्स मिळतात. चवीला अत्यंत छान लागते पोळी किंवा भाकरीबरोबर सुरेख लागते अशी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात... Mangal Shah -
अंबाडा भाजी भाकरी (ambada bhaji bhakhri recipe in marathi)
#HLR अंबाडा भाजी एक पौष्टिक पालेभाजी असून माझ्या फार आवडीची भाजी आहे.मी ही भाजी बऱ्याच दिवसांनी बनवली कारण मी पूर्वी मुंबई मध्ये रहात होते तिथे अश्या गावरान पालेभाज्या मला मिळत नव्हत्या पण आता आम्ही सोलापूर ला बदली मुळे शिफ्ट झालोय ,तर इकडे मला ही भाजी मला मिळाली,माझ्या माहेरी कोल्हापूर ला माझी आई ही भाजी फार सुंदर बनवायची. तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
लाल माठ भाजी (lal math bhaji recipe in marathi)
#mrs नेहमी एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा वेगळी भाजी, वेगळ्या पद्धतीने केली तर सर्वांना मनापासून आवडते.चला तर मग .... चविष्ट भाजी करू या.. Shital Patil -
विदर्भ स्पेशल चवळीची मोकडी भाजी (chavlichi mokdi bhaji recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चवळी ची मोकळी भाजीचवळीची भाजी विशेष करून उन्हाळ्यात मिळते आणि हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक राहते, यात काही ही मसाले पडत नाही फक्त लाल मिरच्या आणि कांद्याची फोडणी असते चला मंग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
फोडशी(कोळुची) भाजी (phodshi bhaji recipe in marathi)
#MSR कोळुची भाजी लांबट गवताच्या पाती सारखी दिसते. चवदार लागते. औषधी व पौष्टीक आहे अशी ही कोळु ची भाजी मुगडाळ टाकुन मी केलीय चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
शेंगदाणा कूट घालून लाल माठ भाजी (shengdana ghalun lal math bhaji recipe in marathi)
#msr # लाल माठाची भाजी किती प्रकारे करता येते, हे Cookpad मुळे कळले. म्हणून मग आज मी केली आहे, शेंगदाणा कूट घालून भाजी.. खरेच मस्त लागते भाजी.. Varsha Ingole Bele -
लाल कोबीची भाजी (laal kobichi bhaji recipe in marathi)
जरा भित भित च ही आज पहिल्या दा भाजी करून बघितली .पण मस्त झाली.:-) Anjita Mahajan
More Recipes
- शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पानाची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
- "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
- फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
टिप्पण्या