राजस्थानी चुरमा लाडू (rajasthani churma ladu recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#दिवाळी#अन्नपुर्णा #2
लाडू म्हटले की,रवा बेसन, मैदा,असेच काही आपल्या डोळ्यासमोर येते.ह्यावेळेस सगळ्या ला काट देवून काही तरी हटके करावे असे डोक्यात होते कुकपॅड अन्नपूर्णा मुळे ते लगेच अमलात आले.राजस्थानी चुरमा लाडू रेसिपी शेअर करीत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 लाडू होतात.
  1. 500 ग्रॅम जाडसर कणीक (करकरा आटा)
  2. 400 ग्रॅम नरम गुळ
  3. तळण्यासाठी तेल
  4. 3 टेबलस्पूनमोहना साठी साजुक तूप
  5. 300 मि.ली.सायीसकट दुध (अंदाजे)
  6. 1 टिस्पून वेलचीपूड
  7. 100 ग्रॅम काजू बदाम पावडर
  8. 4 टेबलस्पूनतूप लाडू वळताना अंदाजे
  9. चिमूटभर मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    परातीत कणीक घेऊन त्यात तुपाचे मोहन आणि लागेल तसे सायीसकट दुध घालून घट्ट मळून घ्यावी.1/2 तास झाकून ठेवावी.

  2. 2

    नंतर मळून त्याचे मुटके वळून तेलात मंद आचेवर तळून घ्यावे.लालसर तळावे.

  3. 3

    थंड झाल्यावर हाताने तुकडे करून मिक्सरमध्ये रवा काढावा

  4. 4

    गुळ मिसळून फूड प्रोसेसर मध्ये फिरवून एकजीव करून घ्यावे.काजुबदाम पावडर आणि वेलची पूड घाला.

  5. 5

    लागेल तसे गरम तुप घालून लाडू वळावेत.हे लाडू खमंग तर लागतातच शिवाय पौष्टिक ही आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes