भडंग (Bhadang recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#भडंग # ही ट्रेड रेसिपी आहे.
आमच्यकडे महिन्यातून एक दोनदा तरी मी भडंग बनवत असते. भडंग बनवायला वेगळे कुरमुरे असतात. पण आमच्या इथे तसे मिळत नाही. म्हणून मी आमच्याकडे जे कुरमुरे मिळतात त्याचाच भडंग बनवले आहे. दुपारच्या चहा बरोबर खायला मस्तच लागतात. त्यात कांदा टोमॅटो घालून खायला पण छान लागते. तर असं हे झणझणीत चटपटीत भडंग कोल्हपूर, सांगलीचे प्रसिद्ध आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15मिनिटे
6व्यक्तींसाठी
  1. 4 कपकुरमुरे
  2. 1 कपशेंगदाणे
  3. 1/2फुटाण्याची डाळ
  4. 10-12कढीपत्त्याची पाने
  5. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टेबलस्पूनधने पावडर
  8. 1 टेबलस्पूनजिरें पावडर
  9. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  10. 1 टेबलस्पूनमीठ
  11. 1 टेबलस्पूनजिरें
  12. 1 टेबलस्पूनराई
  13. 1/2 टेबलस्पूनहिंग

कुकिंग सूचना

10-15मिनिटे
  1. 1

    सर्व आवश्यक साहित्य जमऊन घ्यावे

  2. 2

    शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ मध्यम आचेवर थोडया तेलात परतुन घ्यावी.

  3. 3

    त्याच कढईत तेल घालून त्यात राई घालावी. राई तडतडल्यावर जिरें, हिंग व कढीपत्ता घालावा. गॅस मंद करून सर्व मसाले घालावेत

  4. 4

    मसाले ढवळून त्यात कुरमुरे, शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ घालून सर्व पाच मिनिटे ढवळून घ्यावे. वरून मीठ व पिठी साखर घालून परत चांगले मिक्स करून घ्यावे. झणझणीत गरमागरम भडंग तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes