पोह्यांचे थालिपिठ (pohyanche thalipeeth recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

पोह्यांचे थालिपिठ (pohyanche thalipeeth recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

55 मिनिटे
तीन
  1. 150 ग्रॅमपोहे
  2. 75 ग्रॅमगव्हाचे पीठ
  3. 75 ग्रॅमबेसन पीठ
  4. 1मोठा कांदा
  5. 1 चमचाकोथिंबीर
  6. 1 चमचातीळ
  7. 1/2 चमचाओवा
  8. 1/4 चमचाहळद
  9. 3-4हिरव्या मिरच्या
  10. 8-10लसूण पाकळ्या
  11. 8-10कडीपत्ता पाने
  12. 1 चमचाधणे
  13. 1 चमचाजीरे
  14. 1/4 चमचाहिंग
  15. 1/2 चमचालाल तिखट
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

55 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये पोहे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले. व दहा मिनिटे भिजवून ठेवले.

  2. 2

    नंतर एका परातीत भिजवलेले पोहे मळून घेतले.मग त्यात गव्हाचे पीठ व बेसन पीठ घातले.

  3. 3

    मग हिरव्या मिरच्या, लसून पाकळया कडीपत्ता पाने, धणे व जीरे जाडसर वाटून घेतले.

  4. 4

    नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, एक चमचा तीळ,अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद,पाव चमचा हिंग, थोडे लाल तिखट पिठात मिक्स करून घेतले.

  5. 5

    मग त्याच पिठां मध्ये वाटून घेतलेला मसाला घालून व बाकीचे सर्व साहित्य घालून व चवीनुसार मीठ घालून पीठ चांगले मळून घेतले.

  6. 6

    नंतर मळलेल्या पिठाला एक चमचा तेल लावून चांगले मळून घेतले. मग पोळपाटावर प्लास्टिक लावून त्यावर थालीपीठाचा गोळा घेऊन ओलसर करून हाताने थापून घेतला. व थालीपिठ गरम तव्यावर घालून त्यावर तेल घालून खरपूस भाजून घेतले.

  7. 7

    अश्यारितीने सर्व थालिपिठ करून घेतली. व दही, टोमॅटो सॉस बरोबर गरमा गरम पोह्याचे थालिपिठ सर्व्ह करावे. ही थालिपिठ चवीला खूप सुंदर लागतात. व तीळ असल्यामुळे छान कुर कुरीत लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes