झणझणीत लसुण भुरका (lasun bhurka recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#KS5

"झणझणीत लसुण भुरका"

झणझणीत लसुण भुरका (lasun bhurka recipe in marathi)

#KS5

"झणझणीत लसुण भुरका"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा बारा मिनिटे
चार पाच
  1. 1/2 कपशेंगदाणेे
  2. 1/2 कपपांढरे तीळ
  3. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 1/2 कपसोललेला लसुण
  7. चवीनुसारमीठ
  8. 3 -4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

दहा बारा मिनिटे
  1. 1

    शेंगदाणे भाजून साल काढून घ्या.तिळ हलकेच भाजुन घ्या.शेंगदाणे आणि तिळ मिक्सरमधून ओबडधोबड करून घ्या.बाकिचे साहित्य जमवून घ्या.लसुण सोलून त्याचे उभे काप करून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे चांगले फुलवुन घ्या.लसुण टाकून सोनेरी रंगावर तळून घ्या.मग तिळ घालून मिश्रण मिक्स करून घ्या.हिंग घाला.

  3. 3

    शेंगदाणे कूट घालून सगळे मिश्रण चांगले तळून घ्या.मीठ घाला.सगळे खरपूस तळून झाले की गॅस बंद करा व लाल तिखट घालून घ्या.

  4. 4

    सगळे एकत्र मिसळून घ्या.झणझणीत लसुण भुरका तयार झाला

  5. 5

    तयार लसुण भुरका भाकरी चपाती सोबत ही छान लागतो.ताटात डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून मस्तच 👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes