भाताचे खमंग थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#cooksnap राजश्री येळे यांची रेसिपी मी रिक्रीएट केली. ही त्यांच्या आईची रेसिपी आहे.म्हणजे खास असणारच. माझ्याकडे भात होता ,चटणी नुकतीच केली.वरण संपलं होतं.आणि मी काय नवीन करू भाताचं ,म्हणजे पोटभरीचे होईल ह्या विचारात होते.आणि मला राजश्री मॅडम ची ही रेसिपी आठवली. फारच थोडा बदल करून मी थालिपीठ केले.अतिशय रुचकर आणि मस्त झाले.मला तर खूपच आवडले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
१-२
  1. 1 कपशिजलेला भात
  2. 2 टेबलस्पूनज्वारीचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनबेसन
  4. 1लाल मिरची
  5. 1हिरवी मिरची
  6. 3-4लसूण पाकळ्या
  7. 5-6कडीपत्ता पाने
  8. 2 टेबलस्पूनदही
  9. 1/2 टीस्पूनमीठ....चवीनुसार कमी जास्त
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 1/2 टीस्पूनतीळ
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. चिमूटभरहिंग
  14. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  15. 1-2 टेबलस्पूनतेल....आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    शिजलेल्या भातात ज्वारीचे पीठ,बेसन,मीठ,चिरलेली कोथिंबीर, हळद,दही घातले.

  2. 2

    जीरे, मिरची, लसूण खलबत्त्यात कुटून घेतले.

  3. 3

    तव्यावर १ टेबलस्पून तेल घालून, त्यात मिरची चे तयार वाटण,तीळ,हिंग,कडीपत्ता घालून छान परतून घेतले.

  4. 4

    तयार फोडणी भाताचे मिश्रणात घालून छान मिक्स करून गोळा तयार केला.मी ह्यात मला आवडते म्हणून दही वापरले आहे,पण आवडत नसल्यास पाणी वापरावे.गोळा बनेल इतपतच दही किंवा पाण्याच्या वापर करावा.

  5. 5

    एवढ्या गोळ्याचे दोन भाग केले.म्हणजे एवढ्या मिश्रणातून माझी दोन थालिपीठ तयार झाली.तव्याला तेल लावून त्यावर थालिपीठ थापून घेतले.मधेमधे बोटांच्या साहाय्याने छोटी भोके पाडून त्यात तेल सोडले.झाकण लावून ५-७ मिनीटे मंद आचेवर शिजू दिले.

  6. 6

    दोन्ही बाजूंनी थालिपीठ खमंग भाजून घेतले.अशाच पद्धतीने दुसरे थालिपीठ करून घेतले.

  7. 7

    गरम गरम थालिपीठ नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes