दुध मसाला आणि मसाला दूध (masala powder ani masala dudh recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#mfr
कोजागिरी साठी तयार केलेले खास दूध मसाला आणि त्यापासून तयार केलेले मसाला दूध अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते आता साहित्य आणि कृती पाहूया

दुध मसाला आणि मसाला दूध (masala powder ani masala dudh recipe in marathi)

#mfr
कोजागिरी साठी तयार केलेले खास दूध मसाला आणि त्यापासून तयार केलेले मसाला दूध अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते आता साहित्य आणि कृती पाहूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५- मिनिटात
२ - लोकांचे दूध
  1. दूध मसाल्यासाठी साहित्य
  2. 1 वाटीकाजू
  3. 1 वाटीबदाम
  4. 1 वाटीपिस्ता
  5. 6-7 हिरवी वेलची साल काढून
  6. 1 चिमूट केशर
  7. 2 टेबलस्पुनपिस्त्याचे काप
  8. 2 टेबलस्पुनबदाम काप
  9. 2 टेबलस्पूनकाजूचे काप
  10. दूध तयार करण्यासाठी
  11. 2 ग्लास दूध
  12. 4 टेबलस्पून साखर(मीडियम साईज चमचा)
  13. 2-4 टेबलस्पूनतयार केलेला दूध मसाला

कुकिंग सूचना

१५- मिनिटात
  1. 1

    सर्वप्रथम बदाम काजू पिस्ता ड्राय भाजून घ्यावेत अख्खे बदाम काजू पिस्ता भाजुन झाल्यानंतरकाजू पिस्ता बदाम चे काप भाजून घ्यावेत

  2. 2

    अख्खे काजू पिस्ता बदाम थंड झाल्यानंतरमिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये सोललेली हिरवी वेलची घालून काढून घ्यावे(मिश्रण जास्त बारीक काढू नये)थोडसं जाड मिश्रण असावेअशाप्रकार मिश्रण काढून झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये केशर आणि काजू पिस्ता बदामाचे काप मिक्स करावे अशाप्रकारे आपला दूध मसाला तयार होतो

  3. 3

    दुध बनवण्यासाठी पॅन मध्ये दोन ग्लास दुध गरम करायला ठेवावे दुधाला उकळी आल्या नंतर त्यामध्ये चार चमचे साखर घालावी साखर घातल्यावर दुधाला एक उकळी घ्यावी व नंतर तयार केलेला चार चमचे दूध मसाला घालावा दूध मसाला घातल्यानंतर पाच ते दहा मिनिटे उकळू द्यावे

  4. 4

    आशा प्रकारे आपलं मसाला दूध तयार होतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes