बीट रूट इडली (Beet root idli recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

हलकी फुलकी इडली पूर्वी बाहेर हाॅटेल आणि रेस्टाॅरण्टमधे मोठ्या आवडीनं खाल्ली जायची. पण पूर्वीच्या तुलनेत आपल्या आहारात इडलीचं प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलं आहे, कारण आता इडली केवळ हाॅटेलमधेच नाहीतर घरोघरी होते. झटपट होणारा हा पदार्थ कोणी सकाळच्या नाश्त्याला तर कोणी दुपारच्या जेवणात खातात किंवा रात्री काहीतरी लाइट हवं म्हणून रात्रीच्या जेवणासाठी करतात.

इडली ही लो कॅलरी डाएट म्हणून ओळखली जाते.सकाळच्या नाश्त्याला इडली चटणी खाल्ल्याने ह्र्दयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो.इडलीसोबत चटणी आणि भाज्या घातलेल तुरीच्या डाळीचा सांबार खाल्ल्यानं शरीराला प्रथिनं, फायबर आणि आवश्यक ॲसिड आणि विकर एकाच वेळी मिळतात.
पाहूयात हेल्दी बीट रूट इडलीची रेसिपी..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ जणांसाठी
  1. १/२ कपबीटरुट (किसलेले)
  2. 1/2 कपरवा
  3. 1/2 कपब्रेड क्रम्स
  4. 1/2 कपदही
  5. हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  6. १/४कोथिंबीर चिरलेली
  7. १ चमचा लहानजीरे
  8. १ चमचा लहानमोहरी
  9. १/४ चमचा लहानबेकिंग सोड
  10. १ चमचा लहानमीठ
  11. १ चमचा मोठातेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    एका भांड्यात रवा, दही, ब्रेड क्रम्स, बीट किसलेले, मीठ, आणि कोथिंबीर घालून इडली बॅटर सारखे मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    तयार केलेले इडली बॅटर १५ मिनिटांसाठी सेट होण्यासाठी झाकुन ठेवावे.

  3. 3

    एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी, हिरव्या मिरची घालून फोडणी करावी आणि ही फोडणी तयार केलेल्या इडली बॅटर मध्ये घालून मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    इडली बॅटर इडली मोल्ड मध्ये किंवा इडली पॅनमध्ये घालण्यापूर्वी बेकिंग सोडा घालून मिक्स करावे.

  5. 5

    इडली मोल्डला तेल लावून घ्यावे आणि साधारण दोन ते तीन चमचे बॅटर घालुन पॅन तयार करणे.

  6. 6

    इडली कुकर मध्ये १ ग्लास पाणी घालून त्यामध्ये इडली स्टॅड ठेवून मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे ठेवणे.

  7. 7

    तयार झालेली बीटरुट इडली खोबऱ्याच्या चटणीबरोबर,सांबर बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes