स्टफडं व्हेजी इडली (Stuffed Veggie Idli Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#BRR
रोज नाश्त्याला काय करावं ? हा प्रश्न प्रत्येक गृहिणी च्या पुढे असतो . रोजच्याच पदार्थात थोडासा बदल केला कीं , सगळे आवडीने खातात .
आज चट्कन होणारी स्टफड व्हेजी इडली केली आहे .मुलांना डब्यात देता येते . इडली बरोबर भाज्या ही मुलांच्या पोटांत जातात .मोठ्यांना पण ही इडली आवडते .
चला आता आपण याची कृती पाहू

स्टफडं व्हेजी इडली (Stuffed Veggie Idli Recipe In Marathi)

#BRR
रोज नाश्त्याला काय करावं ? हा प्रश्न प्रत्येक गृहिणी च्या पुढे असतो . रोजच्याच पदार्थात थोडासा बदल केला कीं , सगळे आवडीने खातात .
आज चट्कन होणारी स्टफड व्हेजी इडली केली आहे .मुलांना डब्यात देता येते . इडली बरोबर भाज्या ही मुलांच्या पोटांत जातात .मोठ्यांना पण ही इडली आवडते .
चला आता आपण याची कृती पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 व्यक्ती
  1. 1/2 कपरवा
  2. 1/2 कपदही
  3. 1/4 कपपाणी
  4. 1बटाटा (उकडलेला मध्यम आकाराचा)
  5. 1 टेबलस्पूनहिरवा वाटाणा (पीज)
  6. 2-4फरसबी,
  7. 1कांदा (मध्यम आकाराचा)
  8. 1 टेबलस्पूनमोडाची मटकी
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 7-8लिंबूरस थेंब
  12. 1/2 चमचापावभाजी मसाला
  13. 1 टीस्पूनलाल तिखट
  14. 1/2 टीस्पूनधणे पूड
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. चवीपुरते मीठ
  17. चिमूटभरबेकिंग सोडा
  18. 2 टेबलस्पूनतेल फोडणीस

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    एका पातेल्यात रवा घ्या. त्यांत दही व पाणी टाकून, मिश्रण छान मिक्स करा व पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवा.

  2. 2

    कांदा,फरसबी, बारीक चिरून घ्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करा. मटार, फरसबी व मोड आलेली मटकी, यांना एक वाफ आणवून, शिजवून घ्या. त्यातील पाणी काढा.उकडलेल्या भाज्या व उकडलेला बटाटा छान मॅश करा.

  3. 3

    एक टेबलस्पून तेलाची फोडणी करा. त्यांत जीरे टाका. ते तडतडल्यानंतर, कांदा, हिरवी मिरची तुकडे टाका.त्यातच हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला टाका.ते परतून झाल्या नन्तर त्यांत मॅश केलेल्या भाजी टाका. वरुन धने पावडर, मीठ व लिंबू रस टाकून, छान मिक्स करा व एक वाफ येऊ द्या. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.स्टफिंग तयार झाले.

  4. 4

    15 मिनिटानंतर भिजलेल्या पिठात, मीठ एक पिंच सोडा,1 टेबलस्पून पाणी टाकून, बॅटर छान फेटा. इडली पात्रात पाणी टाकून हे तापू दय.वाट्याना तेलाने ग्रीसिंग करा. त्यांत 3/4 इडली बॅटर टाका.व इडली च्या पात्रात ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्या.

  5. 5

    ईडल्या गार झाल्यानंतर,सुरीने हलक्या हाताने इडलीच्या मधोमध,दोन भाग करा.एका बाजूला भाज्यांचे स्टफिंग भरा.त्यावर दुसरी इडली ठेवा. सर्व इडल्या आशा पध्दतीने तयार करा.

  6. 6

    पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाका. ते तापल्यानंतर त्यांत मोहरी व जीरे टाका. ते तडतडल्यानंतर कोथिंबीर टाकून थोडेसे परता व त्यांत, स्टफिंग केलेल्या ईडल्या, दोन्ही बाजूने खरपूस भाजून काढा.
    गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes