शेंगोळे

Kanchan Chipate
Kanchan Chipate @cook_20298781

#goldenapron3 हा पदार्थ पारंपारिक आहे.परंतु आता हा पदार्थ लोप पावत आहे .या पदार्था मध्ये वेगवेगळ्या पीठांचा वापर केला जातो .परंतु मी यांत तांदुळपिठ, बेसन,गाजर यांचा वापर केला .यामुळे यातील पौष्टीक घटक वाढले .तसेच रस्स्यासाठी लाल,हिरवी सिमला मिरची गाजर ,कांदा यांचा वापर केल्याने जास्तच चवदार झाले नि शरीरास आवश्यक घटक वाढले .

शेंगोळे

#goldenapron3 हा पदार्थ पारंपारिक आहे.परंतु आता हा पदार्थ लोप पावत आहे .या पदार्था मध्ये वेगवेगळ्या पीठांचा वापर केला जातो .परंतु मी यांत तांदुळपिठ, बेसन,गाजर यांचा वापर केला .यामुळे यातील पौष्टीक घटक वाढले .तसेच रस्स्यासाठी लाल,हिरवी सिमला मिरची गाजर ,कांदा यांचा वापर केल्याने जास्तच चवदार झाले नि शरीरास आवश्यक घटक वाढले .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०ते २५मिनिटे
४ते ५व्यक्ती
  1. १०० ग्राम तांदुळ पिठ
  2. १०० ग्राम बेसन
  3. १०० ग्राम गाजर पेस्ट
  4. १ टेबलस्पुन तिखट
  5. १ टीस्पुन हळद
  6. १ टीस्पुन गरम मसाला
  7. १ टेबलस्पुन तीळ
  8. १ टेबलस्पुन धनेजिरे पुड
  9. ४ टेबलस्पून तेल
  10. गरजेनुसार मीठ
  11. २ टेबलस्पुन आलेलसून पेस्ट
  12. १०० ग्राम लाल,हिरवी सिमला मिरची
  13. छोटे टमाटर चिरलेले
  14. कांदा, हिरवी पात चिरलेले
  15. छोटे गाजर चिरलेले
  16. चिमूटभरहिंग
  17. कोथिंबीर
  18. कडीपत्ता
  19. १ टीबलस्पून आमचुर पावडर
  20. १ टीस्पुन गुळ(आवडीनुसार)
  21. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

२०ते २५मिनिटे
  1. 1

    तांदुळपीठ,बेसन व गाजर पेस्ट एकत्र करून त्यात धने,जिरे पुड,मीठ,तिखट, हळद, हिंग,थोडेसे तेल,तीळ,आलेलसुन पेस्ट घालुन मळून गोळा करून घेणे (गाजर पेस्ट असल्याने पाणी वापरावे लागणार नाही)थोडा वेळ ठेऊन तेलाचे हाताने मळून आपल्याला हवे त्या आकारात सेंगोळे करून घेणे.

  2. 2

    गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात एक स्टँड ठेऊन त्यावर एका चाळणीला तेल लावुन शेंगोळे ठेऊन वाफवुन घेणे.

  3. 3

    गॅसवर कढई ठेऊन त्यात तेल गरम करून घेणे फोडणी करिता राई, जिरे घालुन छान फुलू देणे.नंतर कढीपत्ता, कांदा टमाटर घालणे हे थोडे होत आले की सिमला मिरची गाजर घालणे व आलेलसून पेस्ट घालुन मंद आचेवर होऊ देणे. मग यात तिखतमीठ, धनेजिरे पुड,हळद, हिंग, घालुन छान एकसारखे हलवुन घेणे व गरजेनुसार पाणी घालणे.गरम मसाला,आमचुर पावडर व गुळ घालून उकळी येऊ देणे व मग तयार शेंगोळे यात सोडुन झाकणे व एक,दोन उकळी काढून घेणे.गॅस बंद करून कोथिंबीर घालुन घेणे.खाण्या करीत शेंगोळे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kanchan Chipate
Kanchan Chipate @cook_20298781
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes