आंबट-गोड मँगो पुरी (MANGO PURI RECIPE IN MARATHI)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#मॅन्गो... आपण रताळ्याच्या पुर्‍या, बटाट्याच्या पुऱ्या करतो तसं आंब्याचा गर काढून करून बघितल्या पुऱ्या छान झाल्यात.चवीला सुद्धा छान आंबट गोड लागतात. आपण आंब्याच्या गर काढण्यापासून कणीक भिजवणे पर्यंत,पुऱ्या लाटण्या पासून तर तळण्यापर्यंत, आणि त्यानंतरही घरात मस्त आंब्याचा सुगंध दरवळत असतो.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2आंब्यांचा गर
  2. 2 वाटीकणीक
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1/2 वाटीसाखर
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टी स्पूनविलायची पावडर
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर काढून त्यामध्ये मीठ, साखर,वेलची पावडर टाकून बारीक करून घेणे.

  2. 2

    एका पातेल्यात कणीक घेऊन त्यात दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ टाकून घेणे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला आंब्याचा गर कणीकेमध्ये थोडा थोडा टाकून मिक्स करून त्याचा गोळा करून घेणे.पाणी अजिबात टाकायचं नाही.

  4. 4

    मग त्या गोळ्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि तेलामध्ये तळून घ्याव्यात.

  5. 5

    आपली खुसखुशीत आंबट गोड आंबा पूरी तयार आहे. ही पुरी लहान मुलं साधी अशी पण खाऊ शकतात. किंवा आंब्याच्या रसासोबत सुद्धा खाऊ शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes