मँगो फ्रुट कस्टर्ड (MANGO FRUIT CUSTARD RECIPE IN MARATHI)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#मॅन्गो.... मॅन्गो आमच्या घरी सर्वांचे खुप आवडतं फ्रुट आहे. उन्हाळा आला की माझा मुलगा आंब्याच्या प्रतीक्षेतच असतो. त्याला मँगो अतिशय आवडतात. आणि मला सुद्धा. तेव्हा आमच्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. खरं सांगू का आमच्याकडे आंबे घरी आलेत की ते एक दिवसात संपून जातात .कारण आंब्याचा सुगंध इतका छान वाटतो, की ते स्वतःच आपल्याकडे बोलावून घेतात. चवीला आंबट गोड अशा या आंब्यापासून कितीतरी छान छान पदार्थ तयार करता येतात .आज मी आंब्यापासून मंगो फ्रूट कस्टर्ड केलेल आहे. मस्त झालंय.😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीआंब्याचे काप
  2. 1 वाटीअंगुराचे काप
  3. 1 वाटीडाळिंबाचे दाणे
  4. 1 वाटीखरबुजाचे काप
  5. 2 चमचेकस्टर्ड पावडर
  6. 1 लिटरदूध
  7. 1/2 कपथंड दूध
  8. 1/2 वाटीसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दुधाला उकळू द्यावे. दूध उकळत असतानाच इकडे अर्धा कप थंड्या दुधामध्ये दोन चमचा कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    दुधात मिक्स केलेला कस्टर्ड गॅसवर गरम होत असलेल्या दुधामध्ये थोड थोड टाकत राहून चमच्याने घोटत राहावे. व त्यात अर्धा कप साखर टाकून परत घोटत राहावे जेव्हा कस्टर्ड थोडंसं घट्टसर आलं की गॅस बंद करून द्यावा व कस्टर्ड थंड होऊ द्यावे.

  3. 3

    कस्टर्ड थंड झाल्यावर त्यामध्ये क्रमाक्रमाने दोन दोन टेबल स्पून फ्रूटस टाकावेत व फ्रिजमध्ये दोन तासांसाठी थंड करायला ठेवावे दोन तासानंतर मँगो फ्रुट कस्टर्ड फ्रीजमधून बाहेर काढून एका काचेच्या ग्लासमध्ये टाकावे व परत त्यावर फ्रुट्स ने गार्निश करावे. आपलं कुल कुल मँगो फ्रुट कस्टर्ड खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी तयार आहे. त्याचा आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes