एग्ज 65 (egg 65 recipe in marathi)

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
Navi mumbai

आज संडे असल्यामुळे अंड्याचा मेनू...

एग्ज 65 (egg 65 recipe in marathi)

आज संडे असल्यामुळे अंड्याचा मेनू...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 6घट्ट उकडलेली अंडी
  2. 1 चमचाहिरवी मिरची बारीक चिरलेली
  3. 1/4 चमचालाल तिखट/हळद
  4. 1 चमचाधने जिरे पावडर
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 2 चमचाकॉर्नफ्लोअर
  8. 1 चमचामैदा
  9. 3/4 चमचेब्रेड क्रम्स
  10. 1 छोटाकांदा
  11. 2 चमचेटोमॅटो केचप
  12. 2 चमचेरेड चिली सॉस
  13. 1/4 चमचाबारीक चिरलेलं आलं
  14. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला लसूण
  15. 1/2 चमचागरम मसाला
  16. 1कच्च्या अंड्याचा पांढरा भाग

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    अंड्यातील पिवळा भाग काढून पांढ-या भागाला छान बारीक चिरून घ्यावे... आता एका बाऊल मध्ये बारीक चिरलेले अंडी एक चमचा कॉर्नफ्लोर, कच्चा अंड्याचा पांढराभाग बारीक चिरलेला लसूण हिरवी मिरची चिरलेली कोथिंबीर लाल तिखट धने जिरे पावडर मैदा.. आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण हलक्या हाताने एकजीव मळून घ्यावे

  2. 2

    आता या मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे बाॅल्स करून तेलामध्ये मध्यम आचेवर छान तळून घ्यावे

  3. 3

    सर्व बॉल्स तळून झाल्यावर... एका वाटीमध्ये दोन चमचे टोमॅटो केचप दोन चमचे रेड चिली सॉस एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि तीन ते चार चमचे पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून ठेवून...एका दुसऱ्या कढईमध्ये मध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यात चिरलेला बारीक लसून चिरलेलं आलं आणि कांदा टाकून मोठ्या आचेवर फ्राय करावा जास्त शिजवू नये आता वाटीमध्ये बनवलेलं पेस्ट त्यात टाकावे आणि तळलेले बाॅल्स टाकून परतून घ्यावे.. तयार आहे एग्ज 65.. गरमागरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
रोजी
Navi mumbai
The makeup artist
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes