मेदू वडा

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#फ्राईड
खमंग व चटपटीत मेदू वडा. हि एक साऊथ इंडियन डिश आहे.

मेदू वडा

#फ्राईड
खमंग व चटपटीत मेदू वडा. हि एक साऊथ इंडियन डिश आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 m.
4 सर्व्हिंग्ज
  1. 1वाटी उडीद डाळ
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 1 इंचआले
  4. 3टि स्पून नारळाचे बारिक तुकडे
  5. 1/2टि स्पून बेकिंग सोडा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी
  8. सांबर साहित्य :
  9. 1/2 वाटी तूर डाळ
  10. 2टोमॅटो
  11. 2कांदा
  12. कोथिंबीर
  13. 2टि स्पून तिखट
  14. 2टि स्पून सांबर मसाला
  15. 1/2टि स्पून हळद
  16. 1/4टि स्पून हिंग
  17. 1टि स्पून धणे पावडर
  18. 1टि स्पून जीरे पावडर
  19. 2टि स्पून चिंचेचा कोळ
  20. 3टि स्पून गुळ
  21. 3टि स्पून तेल
  22. 1/2टि स्पून हळद
  23. 1/2टि स्पून मेथी दाणे
  24. चटणी साहित्य :
  25. 1/2वाटी नारळाचे तुकडे
  26. 1/2वाटी पंढरपुरी डाळे
  27. 4मिरच्या
  28. कोथिंबीर
  29. 1 इंचआले
  30. 5-6लसूण पाकळ्या
  31. 1/2वाटी दही
  32. 1टि स्पून साखर
  33. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 m.
  1. 1

    उडिद डाळ धुऊन 4 तास भिजत ठेवून नंतर त्यातील पाणी काढून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

  2. 2

    वाटलेल्या डाळीत मिरच्यांचे तुकडे, नारळाचे तुकडे, खिसलेले आले व मीठ घालून चांगले एकजीव करावे, नंतर त्यात बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करावे. एका कढईत तेल गरम करायला ठेवा. चहा गाळणीवर डाळीचे पीठ घालून मधे होल करणे.

  3. 3

    गरम तेलात वडे छान खमंग तळून घ्यावे. तुर डाळ धुऊन घ्या. डाळीत 1 टोमॅटो व 1 कांदा चिरून आवश्यक तेवढे पाणी घालून शिजवून घ्यावे.

  4. 4

    एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद, मेथी कढिपत्ता घालून फोडणी करून त्यात कांदा व टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात सर्व मसाले घालून त्यात शिजवलेली तुर डाळ,चिंच, गुळ व मीठ घालून चांगले खळखळून उकळी आणावी. चटणी चे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

  5. 5

    एका डिश मध्ये 2 वडे ठेवून त्यावर सांबार घालून चटणी बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes