जवसाची चटणी (jawas chutney recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

जवसाची चटणी (jawas chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
  1. 1/2 कपजवस
  2. 1/3 कपशेंगदाणे
  3. 10-15लसणाच्या कळ्या
  4. 1/2 टेबलस्पूनतिखट
  5. 2 टीस्पूनमीठ
  6. 2 पिंचहिंग
  7. 2 पिंचसाखर
  8. 1 टीस्पूनजिरे
  9. 1 टीस्पूनआमचूर पावडर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम जवस मध्ये कचरा असेल तर स्वच्छ करून घ्यावेत. व नंतर मंद आचेवर जवसाला कढईमध्ये टाकून भाजून घ्यावेत. भाजतांना जवस तडतड उडतील. छान भाजून झालेत कि गॅस बंद करावा. जवस जळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यावेत व दोन्ही थंड होऊ द्यावे.

  2. 2

    आपली कढई गरम असतेच त्यामध्ये थोडा लसण परतून घ्यावा. गॅस बंदच असावा. जवस व शेंगदाणे थंड झाले कि शेंगदाण्याचे साल काढून घ्यावेत. आता जवस, शेंगदाणे,तिखट,मीठ,जिरे,साखर, आमचूर पावडर, हिंग हे सगळे मिक्स करून घ्यावे. व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

  3. 3

    मिक्सरमध्ये बारीक झाल्यावर ही जवसाची चटणी एका बरणीत भरून ठेवावी. ही चटणी महिनाभर छान राहते. आपल्या ताटाच्या डाव्या बाजूची रंगत सुद्धा वाढवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes