ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#GA4
#week21
#हळदी
#हळदीभाजी
गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये row haldi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. हळदी आणि तिचे गुण आपल्या सर्वांनाच लहानपणापासूनच माहिती आज जगभरात पसरलेली महामारी पासून भारतातील लोकांची इम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे हे जगभरात सगळ्यांच्याच लक्षात आले आहे त्याचे कारण फक्त आपली खाद्य संस्कृती आपण वापरत असलेले मसाले यामुळे आपली इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग आहे इम्युनिटी स्ट्रॉंग साठी सर्वात महत्वाचे ठरले तर 'हळद' काड्यात ,औषधान मध्ये बऱ्याच प्रकारे हळदीचे सेवन करून आपण या महामारी पासून वाचू शकलो तसे बऱ्याच लोकांनी केले ही काढयांचे सेवन करून स्वतःची इम्युनिटी स्ट्रॉंग केली हळदीचे आरोग्यावर खूपच चांगले परिणाम होतात. हिवाळ्यात मिळणारी बाजारात ओली हळदी पासून भाजी बनवली ही भाजी मी सतरा अठरा वर्षांपूर्वी खाल्ली पहिल्यांदा खाल्ली होती राजस्थान मध्ये आईच्या नातेवाइकांकडे आम्ही गेलो होतो तेव्हा आईच्या आत्याने ही भाजी आम्हाला जेवणात केली होती मी ऐकले की हळदीची भाजी जेवणात देणार खूपच आश्चर्य होत होते की काय जेवायला मिळणार आहे काय नाही त्यांच्या किचनमध्येच माझी लुडबुड चालू होते सगळे लक्ष माझे की भाजी करणार तरी कशी ते बघायचे होते. या पद्धतीने बनवून ठेवली तर आठ दहा दिवस ही भाजी चालते याची बनवण्याची पद्धत मधले घटक ही पौष्टिक आहे भाजी आवडली तर नक्की ट्राय करा कूकस्नॅप्ही करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 व्यक्ती
  1. 250 ग्रामओली हळद पिवळी आणि आंबेहळद मिक्स
  2. 1/2 कपमटार दाने
  3. 1 कपदही फेटलेले
  4. 1/3 कपसाजुक तूप
  5. 1 इंचआले किसलेले
  6. 2तेजपान
  7. 3लवंग
  8. 3/4हिरवी इलाइची
  9. 3/4काळी मिरी दाणे
  10. 2हिरवी मिरची कट केलेली
  11. 1/2 टेबलस्पूनजीरे
  12. 1 टेबलस्पूनकाश्मिरी मिरची
  13. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    हळदी आणून धुन वरचे साल काढून चॉपर मधे बारीक करून घेऊ. तुम्हाला वाटल्यास किसूनी घेता येते पण टेस्ट बारीक तुकड्यांमध्ये छान लागतो

  2. 2

    दिल्याप्रमाणे सगळे साहित्य तयार करून घेऊ
    फोडणीची तयारी करून घेऊ

  3. 3

    कढईत तूप टाकून जीरे,खडेमसाले,हिरव्या मिरच्या टाकून फोडणी करून घेऊ

  4. 4

    आता हळद टाकुन फ्राय करून घेऊ हळद तुपावर छान फ्राय करायची आहे खूप छान सुगंध येतो

  5. 5

    हळद फ्राय झाल्यावर किसलेला अद्रक टाकून घेऊ अद्रक मिक्स झाल्यावर उकडलेले मटार दाणे टाकून घेऊ मिक्स करू

  6. 6

    हळदी आणि मटार दाणे व्यवस्थित फ्राय करून घेऊ आता फेटलेले दही टाकून घेऊ

  7. 7

    दही टाकताच भाजीला छान पाणी सुटेल त्यात भाजी छान शिजवून घेऊ

  8. 8

    आता लाल मिरची आणि मीठ टाकून घेऊ आता भाजीतून तूप सुटायला लागेल. गॅस बंद करुन द्यायचा

  9. 9

    सुटलेले तूप भाजीत हळूहळू मुरते भाजी थंड झाल्यावर कोरडी होते ही भाजी शिळी पोळी,बरोबर वरण-भात बरोबर छान लागते

  10. 10

    भाजी फ्रीजमध्ये आठ-दहा दिवस राहते
    वापरताना गरम करून घ्यावी म्हणजे तूप सुटते

  11. 11

    तयार आपली ओल्या हळदीची पौष्टिक अशी भाजी हळद गरम असते त्यात तूप आणि दही टाकल्यामुळे ती आपल्याला शरीराला गरम करत नाही म्हणून अशा पद्धतीने भाजी केली आणि खाल्ली तर त्याचा त्रास होत नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
या रेसिपी मध्ये काश्मिरी मिरची जास्त लिहिली गेली आहे असे नाही का वाटत ? टेबलस्पून ?

Similar Recipes