"पारंपारिक पद्धतीने ओल्या हळदीचे दुध" (olya haldiche dudh recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#GA4
#WEEK21
#Keyword_Row_turmaric

"पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीचे दुध"

पारंपारिक पद्धतीने असे मी म्हटले आहे,पण मी सुक्या हळदीचे दुध बनवले आहे.. ओल्या हळदीचे आज पहिल्यांदाच बनवले आहे..

कीवर्ड ओली हळद होता आणि मी ठरवले या निमित्ताने हळदीचे लोणचे किंवा भाजी असे काहीतरी करावे... कारण मी अजून एकदाही ओल्या हळदीचे लोणचे बनवले नाही... कारण हे हळदीचे पीक आमच्या गावाकडे नसल्यामुळे कधी असे काही बनवण्याचा प्रसंग आला नव्हता किंवा घरात ही रेसिपी बनली नव्हती....
ओली हळद आणण्यासाठी बाजारात गेले परंतु सगळीकडे शोधाशोध करून ही मला काही ओली हळद मिळाली नाही..

थोडीशी नाराज च होती मी... गॅलरीमध्ये जाऊन बसले आणि आता काय आपण ओल्या हळदीची रेसिपी करु शकत नाही..असा मनोमन विचार केला..
पण तेवढ्यात माझ्या लक्षात आले, आपणही कुंडीत ओल्या हळदीचे झाड लावले आहे, बघुया हळद आली की नाही..
हातात जाडसर चमचा घेऊन स्वारी निघाली हळदीचा शोध घ्यायला.. आणि चमच्याने थोडेसे माती उकरून बघीतले आणि मला हळदीचे कोंब दिसले....
" काखेत कळसा आणि गावाला वळसा"ही म्हण आठवली.
मग काय लगेचच काढून घेतले पण एवढ्याशा हळदीचे चहा किंवा दुध बनवू शकतो...
मग मी दुध बनवण्याचा निश्चय करून लगेच लागले कामाला..
आणि हे इम्युनिटी बुस्टर दुध बनवले.. खुप मस्त झाले होते..
चला तर मग या ओल्या हळदीच्या दुधाची रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
चार
  1. 2 टेबलस्पूनकिसलेली ओली हळद
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 1 लिटरदुध
  4. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  5. 1/2 टीस्पूनदालचिनी पावडर

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    पातेल्यात दुध तापत ठेवावे..

  2. 2

    ओली हळद स्वच्छ धुवून पुसून घ्यावी..वरचे साल काढून घ्यावी.व किसून घ्यावी....हात पिवळे होतात..ते होऊ नये असे वाटत असेल तर हातात प्लास्टिक hand gloves घालावे..

  3. 3

    दुध उकळले की त्यात साखर, किसलेली ओली हळद, दालचिनी पावडर घालून चांगले ढवळून घ्यावे..दुधाचा रंग लगेचच पिवळसर होतो..

  4. 4

    दहा मिनिटे बारीक गॅसवर उकळून घ्यावे व दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यावे

  5. 5

    तयार झालेले हळदीचे दुध ग्लासात ओतून वरुन वेलचीपूड व दालचिनी पूड स्प्रिंकल करून सर्व्ह करावे

  6. 6

    अरे हो ओल्या हळदीचे दुध बनवले, रेसिपी सांगितली पण माझं कुंडीतील हळदीचे झाड दाखवायचे राहीले... आणि माझ्या झाडांची ओली हळद..

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes