बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#GA4
#week20
#सूप
#बीटगाजरसूप

गोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनीट
4व्यक्ती
  1. 2मिडीयम साईचे बीट कट केलेले
  2. 1मीडियम साईज चा कांदा कट केलेला
  3. 2गाजर कट केलेले
  4. 1/2 इंचआले कट केलेले
  5. 7/8लसून पाकळ्या बारीक कट केलेल्या
  6. 2हिरव्या मिरच्या कट केलेल्या
  7. 2तेजपान
  8. 1चक्रीफुल
  9. 3/4लवंगा
  10. 5/6काळी मिरी
  11. मीठ स्वादानुसार
  12. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  13. 1 टेबलस्पूनजीरे
  14. 1 टेबलस्पूनसाखर
  15. दूध क्रिम वरून गार्निशिंगसाठी
  16. 2/3टोस्ट करण्यासाठी

कुकिंग सूचना

40 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्या भाज्या कट करून तयार करून घेऊ

  2. 2

    आता कुकर पॅनमध्ये तूप टाकून जीरे, खडे मसाले लसून आले, हिरव्या मिरच्या टाकुन फ्राय करून घेऊ,

  3. 3

    आता कांदा टाकून फ्राय करून घेऊ, कांदा फ्राय झाल्यावर बीट आणि गाजर वरून मीठ टाकून फ्राय करून घेऊ.

  4. 4

    सगळ्या भाज्या फ्राय झाल्यावर पाणी टाकून घेऊ
    कुकर पॅन ला 3 /4 विसल घेऊ

  5. 5

    कुकर थंड झाल्यावर भाज्या गाळनीवर काढून घेऊ तेच पान काढून घेऊ, खालचे पाणी तसेच ठेवायचे ते सूपमध्ये वापरू

  6. 6

    आता गाळनिवरच्या सगळ्या भाज्या मिक्सर पॉट मध्ये घेऊन बारीक पेस्ट तयार करून घेऊ.

  7. 7

    आता तयार भाज्यांची पेस्ट गाळलेल्या पाण्यात मिक्स करून सूप गॅस वर उकळून घेऊ, उकळताना साखर चवी नुसार मीठही टाकून घेऊ.

  8. 8

    गरमागरम बीट गाजर सूप वरून दूध क्रीम ने गार्निश करुन टोस्ट बरोबर सर्व करू.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes