झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#cooksnap
@Rupali atre deshpand

झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)

#cooksnap
@Rupali atre deshpand

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीरवा
  2. 1/2 वाटीदही
  3. 1इनो पॅकेट
  4. 1कांदा
  5. 1गाजर
  6. 1ढोबळी मिरची
  7. 1 टेबलस्पूनआलं मिरची पेस्ट
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  12. 5-6कडीपत्ता पाने
  13. चवीनुसारमीठ
  14. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या कट करून घेणे. एका पातेल्यामध्ये रवा, दही आणि चवीनुसार मीठ ऍड करा आणि थोडे थोडे पाणी टाकून छान बॅटर तयार करून घ्या. पंधरा मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    आता पॅन मध्ये तेल ऍड करा.तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे,मोहरी,कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घ्या. आता यामध्ये कांदा आणि आलं मिरची पेस्ट करून छान मिक्स करून परतून घ्या.

  3. 3

    आता यामध्ये कट केलेल्या सर्व भाज्या ऍड करून थोडेसे मीठ टाकून दोन मिनिटे वाफवून घेणे. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून घालून थंड होण्यासाठी ठेवावे.

  4. 4

    आता या परतून घेतलेल्या भाज्या रव्याच्या बॅटर मध्ये ऍड करून छान मिक्स करून घ्या. गरज असल्यास थोडेसे पाणी ॲड करा जास्ती पातळ करू नये.

  5. 5

    आता बॅटर मध्ये इनो ऍड करा आणि मिक्स करून घ्या आणि लगेचच याचे आप्पे बनवा.

  6. 6

    आप्पे बनविण्यासाठी अप्पे पात्राला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये तयार केलेले बॅटर ॲड करा पाच मिनिटे झाकून आप्पे वाफवून घ्या. आता वरून तेल सोडून दोन्ही साईडने आप्पे खरपूस भाजून घेणे.

  7. 7

    तयार केलेले आप्पे चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे मस्त टेस्टी तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes