पनीर लच्छा पराठा (paneer laccha paratha recipe in marathi)

Rupali Kalpesh Dhuri
Rupali Kalpesh Dhuri @rupali26

पनीर लच्छा पराठा (paneer laccha paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास १५ मिनीट
2 जणांसाठी
  1. 1 टीस्पूनजिर
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टीस्पूनआलं-लसूण पेस्ट
  5. 1 टीस्पूनकस्तुरी मेथी
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनजिरेपूड
  10. 1/2 टीस्पूनआमचुर पावडर
  11. चिमूटभरहिंग
  12. २०० ग्रॅम किसलेले पनीर
  13. कोथिंबीर
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 कपगव्हाचे पीठ
  16. 1 टीस्पूनओवा
  17. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

१ तास १५ मिनीट
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात जिरं घालणे. जिर तडतडले कि त्यात चिरलेला कांदा घालणे. कांदा लालसर झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परतणे.

  2. 2

    टोमॅटो नरम झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालणे. नंतर त्यात कस्तुरी मेथी, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, आमचुर पावडर, चिमूटभर हिंग घालून एकत्र करणे.

  3. 3

    नंतर त्यात किसलेले पनीर, मीठ घालून एकत्र करणे. खणि वरून चिरलेली कोथिंबीर घालणे. आणि मिश्रण थंड करत बाजूला ठेवणे.

  4. 4

    एका ताटात गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ व ओवा एकत्र करुन गरजेनुसार पाणी घालून पीठ घट्ट मळून घेणे. त्याला तेलाचा हखत लावून ठेवणे.

  5. 5

    पिठाचे गोळे करणे। एक गोळा पिठात घोळून लाटून घेणे. आणि त्यावर तयार पनीरचे मिश्रण पसरवणे.

  6. 6

    नंतर एक-एक पट्टी कापणे. (कडेला कापू नये मधल्या भागातच कापणे.)

  7. 7

    कापलेल्या पट्टा एकावर एक ठेवून गोल गुंडाळणे. आणि त्याचा पराठा लाटणे.

  8. 8

    आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Kalpesh Dhuri
रोजी

Similar Recipes