पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#PBR #पराठ/ पंजाबी रेसिपी पंजाब मध्ये दुधदुभते मोठ्या प्रमाणात त्यामुळे घरोघरी लस्सी, दही, पनीर, तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आपण पंजाबी पनीर पराठा कसा करायचा हे बघुया

पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)

#PBR #पराठ/ पंजाबी रेसिपी पंजाब मध्ये दुधदुभते मोठ्या प्रमाणात त्यामुळे घरोघरी लस्सी, दही, पनीर, तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आपण पंजाबी पनीर पराठा कसा करायचा हे बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम गव्हाचे पिठ
  2. 2-3 टेबलस्पुनतेल
  3. 2 टिस्पुनतुप
  4. ४०० ग्रॅम पनीर
  5. 1-2किसलेले कांदे
  6. 1-2 टेबलस्पुनमिरची आल्याचा ठेचा
  7. 1 टिस्पुनसाखर
  8. 1/2 टिस्पून गरम मसाला
  9. ४० ग्रॅम चिरलेली कोथिंबिर
  10. 1/2 टिस्पुनआमचुर पावडर
  11. चविनुसारमीठ
  12. ३० ग्रॅम साजुक तुप

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    पनीर पराठे बनवण्यासाठी पुर्व तयारी करून ठेवा गव्हाचे पिठ त्यात तेल व साजुक तुप मीठ मिक्स करून घट्ट गोळा मळुन ठेवा व10-15 मिनिटे झाकुन मुरण्यासाठी ठेवा. मिरच्या व आले हयाची जाडसर पेस्ट रेडी करा. इतर लागणारे साहित्य काढुन ठेवा.

  2. 2

    मोठ्या बाऊलमध्ये पनीर किसुन किंवा हाताने क्रंबल करून घ्या त्यात मिरची आल्याचा ठेचा, भरपुर चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला, आमचुर पावडर, मीठ, साखर मिक्स करा नंतर त्यात कांदे किसुन घाला सर्व मिश्रण ऐकजिव करा व बाजुला ठेवा

  3. 3

    मुरलेल्या पिठाचा गोळा परत मळुन घ्या त्याचे मोठे गोळे करून ठेवा ऐक गोळा लाटुन त्यात पनीरचे स्टफिंग भरून बंद करा पिठात बुडवुन हाताने चपटे करून सारण सर्व बाजुला पसरवुन नंतर हळुवार हाताने जाडसर पराठा लाटा. गरम तव्यावर सुरवातीला दोन्ही बाजुने चांगला शेकवुन घ्या.

  4. 4

    नंतर साजुक तुप लावुन दोन्ही बाजुंनी खरपुस भाजा आपला पनीर पराठा खाण्या स रेडी

  5. 5

    प्लेटमध्ये प्रत्येक पराठ्याचे सुरीने2 भाग करून मांडणी करा वरून थोडे पनीर किसुन टाका सोबत लिंबाचे तिखटगोड लोणचे व केचप दया व गरमा गरम पनीर पराठे सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (3)

Similar Recipes