उकडीचे मोदक रेसिपी (ukadiche modak recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#ट्रेंडिंग रेसिपी

उकडीचे मोदक रेसिपी (ukadiche modak recipe in marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15_20 मिनिट
4 - सर्व्हींग
  1. 1 कपमोदक पीठ
  2. 1/4 वाटीगुळ
  3. 1 वाटीओल खोबर
  4. वेलचीपूड
  5. सूका मेवा
  6. 1 टेबलस्पूनमिल्क पावडर
  7. 1 टीस्पूनतुप
  8. जितक पीठ तितकच पाणी घ्यावे
  9. 2 चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

15_20 मिनिट
  1. 1

    प्रथम मोदकाच सारण तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवर एक पॅनमध्ये तुप घालुन घेऊ त्यानंतर गुळ मेल्ट करून घेऊ गुळ मेल्ट झाल्यावर ओल खोबर, वेलचीपूड, सूका मेवा,मिल्क पावडर घालून सारण तयार करून घेऊ.

  2. 2

    सारण तयार करून बाजूला ठेवून देऊ थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण मोदकाच्या पीठाची उकड काढून घेऊ. त्यासाठी पाणी ऊकळून घेऊ आणि त्यात मीठ, तुप घाला 1- टीस्पून

  3. 3

    पाण्याला ऊकळी आल्यावर त्यात मोदकाच पीठ घालून मिक्स करुन घेऊ त्यानंतर गॅसची फ्लेम बारीकच ठेवा मिनिटभर झाकण ठेवून मग गॅस बंद करुन घेऊ त्यानंतर पीठ काढून घेऊ ताटात आणि गरमगरम पीठ छान मळून घेऊ.

  4. 4

    आता मोदक बनवायला घेऊ हाताला तुपाचा/तेलाचा हात लावून पारी बनवून घेऊ त्यात सारण भरुन कळया पाडून मोदक तयार करून घेऊ

  5. 5

    असेच सगळे मोदक बनवून घेऊ त्यानंतर गॅसवर मी इडली स्टीमरमध्ये मोदकासाठी पाणी उकळून त्यात आता मोदक ठेवुन देऊ मी एक रुमाल हलकासा ओला करून घेतला आहे आणि त्यात मी मोदक ठेवुन 15-20 मिनिट झाकण लावून वाफ काढून घेऊ मग गॅस बंद करून 5-10 मिनिटांनंतर स्टीमर मधुन मोदक काढून घेऊ.

  6. 6

    आपले मोदक तयार आहेत बाप्पाला नैवेद्य दाखवून🙏 आपण मोदक सर्व्ह करू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes