खुसखुशीत आणि हेल्दी रवा-मटार पॅनकेक (Rava Matar Pancake Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#MR हिवाळ्यातील दिवस असतील तर मग काय नेहमी गाजर ,हिरवा मटार ह्यांची रेल घरात चालूच असते. मग मटार पासून वेगळे काय बनवायचे जेणेकरून रेसिपी पटकन ही बनेल. आणि मुलांना मोठ्यांना भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटामिन भेटतील.. तर मग करूया...

खुसखुशीत आणि हेल्दी रवा-मटार पॅनकेक (Rava Matar Pancake Recipe In Marathi)

#MR हिवाळ्यातील दिवस असतील तर मग काय नेहमी गाजर ,हिरवा मटार ह्यांची रेल घरात चालूच असते. मग मटार पासून वेगळे काय बनवायचे जेणेकरून रेसिपी पटकन ही बनेल. आणि मुलांना मोठ्यांना भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटामिन भेटतील.. तर मग करूया...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाऊण तास
३-४ जणांसाठी
  1. 1 वाटीरवा
  2. 1/4 वाटीदही
  3. 1/2 वाटीहिरवा मटार दाणे
  4. लाल तिखट
  5. हळद
  6. तेल
  7. इनो
  8. लसूण पाकळ्या
  9. जीरे
  10. आले लसूण पेस्ट
  11. मीठ

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन सोलून स्वच्छ धुवून घेतलेले मटार गॅस वर वाफवून घ्या. मग थंड झाले की मिक्सरला सात आठ लसूण पाकळ्या आणि मटार जाडसर वाटून घ्या.

  2. 2

    आता गॅस चालू करून एका पॅन मध्ये तेल गरम करून जीरे, आले लसूण पेस्ट,१ बारीक चिरलेला कांदा, तेलात चांगला परतवून त्यात १ बारीक चिरलेला टोमॅटो परतवून वरून हळद लाल तिखट घालून मटारचे जाडसर मिश्रण मिक्स करा वरून चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. आणि थोडे परतवून गॅस बंद करा.

  3. 3

    आता एका भांड्यात १ कप रवा, पाव वाटी दही, वरील थंड झालेले मटार चे मिश्रण एकजीव करून त्यात थोडे पाणी घालून मिश्रण एकत्र करून थोडे मीठ घालून मिश्रण वरून झाकण ठेवून २० मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून रवा फुगून येईल. नंतर त्यात चिमटी भर इनो घालून ते एकिटवेट होण्यासासाठी त्यात थोडे पाणी घाला. दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून त्यावर एका पॅन मध्ये तेल लावून पळयाच्या साहाय्याने मटार, रव्याचे बॅटर घालून छोटे छोटे पॅन केक बनवून घ्या. तयार गरमागरम हेल्दी नाश्ता...

  4. 4

    दही किंवा चटणी सोबत सव्हऀ करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

Similar Recipes