कोबीच्या वड्या
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोबी खिसून घ्यावा. त्यामध्ये वर नमूद केलेल्या प्रमाणामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, मसाला, मीठ, असे सर्व साहित्य टाकावे.
- 2
सर्व साहित्य एकजीव करून मळून घ्यावे. कोबीला पाणी सुटत असल्यामुळे त्यामध्येच सर्व मिश्रण मळावे. आणि आवश्यक असल्यास थोडे पाणी टाकावे. पीठ मळून झाले की त्याचे उकड घेण्यासाठी 3 भाग करावेत. लांबसर गोळे बनवावेत. एकीकडे स्टिमर मध्ये पाणी तापवत ठेवावे. तयार केलेले गोळे स्टिमर च्या वरच्या भागात उकडायला ठेवावेत. वर झाकण ठेवावेत. साधारण 15 ते 20 मिनिटे कोबीच्या वड्या उकडवून घ्याव्यात.
- 3
उकडलेल्या वड्या थंड झाल्यावर त्यांचे बारीक काप करावेत. कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये या वड्या तळून घ्याव्यात. गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12227366











टिप्पण्या (2)