व्हेज अन्डा करी (veg anda curry recipe in marathi)
#फैमिली
फैमिली डे... पारिवारिक दिन... फैमिली म्हटले की मी,माझा नवरा,व माझी मुलगी इतकेच... पण परिवार म्हटले कि आप्त-स्वकीय, गण-गोत, मित्र-मैत्रिणी,शेजार-पाजर... सगळेच आले की...अश्या माझ्या फैमिली आणि परिवाराला मी केलेली ही डिश खूप आवडते आणी ही डिश जवळ जवळ सत्रा वर्षा पासन मी घरी बनवत आली आहे... व्हेज अन्डा करी..

कुकिंग सूचना
- 1
उकडलेल्या बटाट्यात मीठ ब्रेडचा चुरा घालुन एकजीव करुन घ्या, पनीर घेऊन त्यात रांगा पुरती हळद व मीठ घालुन लाहन गोळे तैय्यार करावे.
- 2
बटाट्याची पारि करुन त्यात पनीर चा गोळा घालुन अंड्यचा आकार द्या कोर्नफ्लोर व थोडे पाणी घालुन पेस्ट करा त्यात बनवलेले अंडे घोळवून घ्या व ब्रेड च्या चुर्यात घोळऊन तळून घ्या. हे झाले व्हेज अंडे
- 3
आत्ता करी पाहुया.... टोमैटो खोबर गैस वर भाजुन पेस्ट करुन घ्या, कढईत तिन ते चार टेबलस्पून तेल घ्या त्यात पहिले तिखट घाला व लगेच पेस्ट घालुन छान परता, मसाल्यात धणे जीरे पुड सावजी मसाला व थोडी हळद घालुन तेल सुटे पर्यंत खमंग परता व तुम्हाला जशी करी हवी असेल तसे गरम पाणी घालवे व दोन तिन उकळ्या येऊ द्या व गैस बन्द करा की झाली करी तैय्यार..
- 4
सर्व्ह करतांना करी मधे एक अन्ड घाला व सोबतीला गरम भाकरी,कच्चा कांदा,भाजलेली निंबु रस घालुन कुस्करलेली मिर्ची आणी कैरीच चटणी... असे ताट सजवले की फैमिली/ परिवार खुश... तर मग करुन पाहा... व्हेज अन्डा करी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या