नो ईस्ट नोओवन सीनँमन रोल क्नॉट (no yeast cinnamon roll recipe in marathi)

नो ईस्ट नोओवन सीनँमन रोल क्नॉट (no yeast cinnamon roll recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दुधामध्ये व्हिनेगर टाकून चांगले मिक्स करून दहा मिनिट सेट करून घ्या.
- 2
आता एका वाटी मध्ये मैदा घ्या. त्यात पावडर शुगर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ ॲड करा.
- 3
आता सेट झालेले दूध आणि तूप किंवा बटर टाकून कणीक मळून घ्या आणि दहा मिनिटं रेस्ट करण्यास ठेवा, (कणिक जास्त घट होत घट्ट होत असल्यास त्यात थोडे दूध ऍड करा).
- 4
एका कढईमध्ये एक कप मीठ टाकून त्यावर स्टॅन्ड ठेवून एक प्लेट ठेवा झाकून मेडियम हिटवर प्रीहिट करण्यास ठेवा.
- 5
फिलिंग बनवण्यासाठी ब्राऊन शुगर सिनॅंमन पावडर आणि बटर एका बाउल मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 6
आता कणिक एक मिनिट पुन्हा मळून घ्या, आणि आयताकार समान थिकनेस मध्ये लाटून घ्या. त्यावर ब्राऊन शुगरचे मिश्रण एक सारखे स्प्रेड करा.
- 7
आता त्याला बुक फोल्ड करा आणि थोडे लाटून समान सहा भागांमध्ये कट करा.
- 8
तयार सहा भागांना आपल्या आवडीनुसार शेप द्या, किंवा वरच्या साईडने थोडे सोडून एक कट मारून क्नोट मारा. आता छोट्या बाअलला बटर लावून त्यामध्ये तयार रोल ठेवा
- 9
आता फ्री-हीट केलेल्या कढईमध्ये हे वाटी ठेवून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे बेक करून घ्या. तयार झाल्यावर वरतून बटर लावा आणि गरम गरम सर्व्ह करा
- 10
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या (4)