खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)

खांन्देशातील लेवा पाटील समाजाचे भरीत हे खुप प्रसिद्ध आहे ते बनवण्याची पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
खांन्देशातील लेवा पाटील समाजाचे भरीत हे खुप प्रसिद्ध आहे ते बनवण्याची पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
कुकिंग सूचना
- 1
- 2
- 3
सर्वप्रथम वांगी गॅस वर पूर्णपणे भाजून घ्या.
- 4
वांगी थोडी थंड झाल्यावर सोलून चमचा च्या सहाय्याने व्यवस्थित चेक करून घ्या. आता त्यांना बडगी किंवा परातीत स्मॅशर च्या साह्याने स्मॅश करून घ्या.
- 5
आता तव्यावर जाड आणि बारीक मिरच्या भाजून घ्या. जाड मिरच्यांना मध्यभागी कट मारून त्यात मीठ लावून घ्या.
- 6
भाजलेल्या बारीक मिरच्या, लसुन, एक चमचा कोथिंबीर, एक चमचा कांद्याची पात
आणि अर्धा चमचा जिरे ठेचून बारीक पेस्ट बनवा, ही पेस्ट ठेचलेल्या वांग्यांमध्ये मिक्स करा. - 7
कढईत तेल गरम करून जिरे मोहरी आणि ओव्याची फोडणी द्या.
- 8
आता त्यात शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्या मग त्यात कढीपत्त्याची पाने टाका त्यापाठोपाठ मीठ लावलेल्या जाड मिरच्या टाकून दोन मिनिटे परतून घ्या.
- 9
मिरच्या परतल्यानंतर वाटाणे टाकून चांगले परतून घ्या, त्यानंतर कांद्याची पात टाकुन दोन मिनिट परतून घ्या.
- 10
आता ठेचलेली वांगे आणि मीठ टाकून मिक्स करून तीन-चार मिनिट शिजवून घ्या. वांगी टाकल्यानंतर जास्त मिक्स करू नये नाहीतर वांगी तेल ॲप्ससॉर्ब करून घेतात.
- 11
बारीक कापलेली कोथिंबीर टाका आणि मिक्स करा. आपले भरीत तयार आहे साध्या किंवा कळण्याच्या पुरी सोबत सर्व करा.
- 12
Keywords
Similar Recipes
More Recipes





























टिप्पण्या (12)