उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात.
उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात.
कुकिंग सूचना
- 1
एका नॉनस्टिक भांड्यात सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्यावे. सर्व एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवावे
- 2
अर्ध्या तासाने मध्यम आचेवर हे भांडे ठेऊन, गुळ वितळून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरावे.
- 3
एका पातेल्यात १ वाटी पाणी घेऊन, चिमुटभर मीठ घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे.पाण्याला उकळी येताच, त्यात तांदुळाचे पीठ घालून, चांगले ढवळावे.हे भांडे आचेवरून उतरून, १० मिनटे झाकून ठेवावे.
- 4
१० मिनिटांनी, मोठ्या परातीत ही उकड घेऊन, गरम असतानाच मळून घ्यावी.मळताना आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून, शेवटी थोडे तेल लावून मऊसर गोळा तयार करावा.
- 5
मोदक करेपर्यंत हा गोळा झाकून ठेवावा.
मोदकपात्रात लागेल तेवढे पाणी घेऊन ते गरम होण्यास ठेवावे.आता उकडीतून छोटा लिम्बाएवढा गोळा घेऊन, दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने खोलगट पारी करावी.ह्या पारीत, एक मोठा चमचा पुरण घालावे.पुरण घातल्यावर, कडा चिमटीत पकडून मोदकाच्या कळ्या काढाव्यात.आता मोदकाच्या तळापासून थोडे थोडे आवळत घेऊन, छान मोदकाचा आकार वळावा.ह्याच प्रमाणे सगळे मोदक करून घ्यावेत.
- 6
प्रत्येक मोदक नीट लावून ठेवावा.मोदकपात्रात ठेवावे.आता मोदकपत्राचे झाकण लावून, १५ मिनटे मोदक उकडून घावेत.गरम गरम साजूक तूप घालून खायला घ्यावेत.
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या