बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)

बेबी कॉर्न आणि मशरूम हे दोन्ही आपल्या शरीरासाठी फार सात्त्विक पदार्थ आहेत, आज मी तुम्हाला सांगणार आहे बेबी कॉर्न आणि मशरूम करी ची रेसिपी.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मशरूम आणि बेबी कॉर्न कट करुन 1 चमचा तेलामध्ये तीन चार मिनिटे परतून घ्या.
- 2
आता टमाटे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं यांची मिक्सर मधून प्युरी बनवून घ्या.
- 3
पॅन मधे तेल गरम करून त्यात दालचिनीचे तुकडे आणि काळे मिरे, मोठी इलायची आणि जिरे टाकून परतून घ्या.
- 4
मसाले परतून झाल्यावर त्यात कांदा टाकून सात-आठ मिनिट परतून घ्या नंतर त्यात तयार केलेली टोमॅटो प्युरी ॲड करा सोबतच हळद लाल तिखट आणि धणेपूड ॲड करून चांगले मिक्स करून मसाला तेल सोडेपर्यंत परतून घ्या.
- 5
आता बेबी कोन आणि मशरूम ॲड करा चांगले मिक्स करा आणि आणि दोन-तीन मिनिट मसाल्यात चांगले परतून घ्या.
- 6
एक कप पाणी ॲड करा आणि आणि पाण्याला उकळी येऊ द्या, उघडी आल्यावर त्यात मीठ ॲड करा.
- 7
आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून पाच दहा मिनिट शिजवून घ्या, नंतर कसूरी मेथी ॲड करा दोन मिनिट शिजवा आणि गॅस बंद करा आपली बेबी कॉर्न-मशरूम करी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)