तंदुरी समोसा मोमोज (tandoori samosa momos recipe in marathi)

तंदुरी समोसा मोमोज (tandoori samosa momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण कणिक मळून घेऊ,त्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा घ्या त्यात अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तेल टाका आणि चांगले मिक्स करा मिक्स केल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण पुऱ्या बनवण्यासाठी भिजवतो त्याप्रकारची कणीक भिजवून कापडाने झाकून ठेवा.
- 2
आता आपण स्टफिंग बनवून घेऊ, त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा, तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे परतून घ्या, नंतर बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने टाकून परतून घ्या.
- 3
आता त्यात बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट टाकून ते थोडा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्या.
- 4
किसलेले गाजर एड करा आणि तीन-चार मिनिट शिजवून घ्या, नंतर त्यात हळद आणि धनेपूड टाका, मिक्स करा,
- 5
वाटाणे टाकून दोन मिनिट शिजवून घ्या आता मीठ टाकून मिक्स करा, आता बटाटे टाकून दोन-तीन मिनिट शिजवून घ्या, आणि शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा. आपले स्टफिंग तयार आहे.
- 6
इडलीपात्रात दोन ग्लास पाणी टाका आणि झाकून ते गरम करण्यास ठेवा, आता तयार मैद्याच्या कणकेचे एक इंची साईज चे तुकडे करा आणि त्याला पुरीसारखे लाटून घ्या. त्यात दीड चमचा स्टफिंग भरा आणि मोदक करतो तसे भरून त्याला प्रेस करा. असे सर्व मोमोज भरून घ्या.
- 7
इडली पात्राच्या प्लेटिला तेल लावून त्यावर तयार केलेले मोमोज ठेवा, आणि प्लेट इडली पात्रात ठेवून दहा ते बारा मिनिट स्टीम करून घ्या. स्टीम झाल्यावर प्लेट बाहेर काढून दोन मिनिटं थंड झाल्यावर मोमोज दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्या. मोमोज तयार आहे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात,
- 8
आता आपण मोमोजला कोटींग करण्यासाठी बॅटर बनवून घेऊ. त्यासाठी एका बाऊलमध्ये दही टाका, त्यात आलं, लसुन,हळद, धने पावडर टाका. आता लाल तिखट लिंबाचा रस तेल आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
- 9
आता तयार बॅटर मध्ये, एकेक मनोज टाकून, पॅन मध्ये थोडे तेल टाकून दोन्ही बाजूंनी शालो फ्राय करून घ्या. आपले तंदुरी समोसा मोमोज तयार आहे, मनोज चटणी सोबत गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या (4)