राजस्थानी गट्टा पुलाव (gatta pulao recipe in marathi)

#पश्चिम
#राजस्थान
राजस्थान मधला खूप प्रसिद्ध असा हा पदार्थ आहे. जो तुम्ही वीकेंडला किंवा पार्टीमध्ये, सणासुदीला बनवू शकता. *राजस्थानी गट्टा पुलाव*.. ला राजस्थान मध्ये "गट्टे ची खिचडी" किंवा "राम खिचडी" म्हणून देखील संबोधले जाते....
चवदार आणि झणझणीत असा हा पुलाव चवीला लागतो. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. बेसनाचे गट्टे, मसाल्याचा सुगंध आणि काजू किस्मिस चा फ्लेवर हा सर्वांना मोहित करणारा असाच आहे, तेव्हा नक्की ट्राय करा *गट्टा पुलाव*..

कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. अर्धा तास पाण्यात भिजत घालून, नंतर पाण्यातून काढून चाळणीत काढून ठेवा. एक पॅन घ्या. त्यात तेल किंवा तूप घाला. तेल गरम झाले की त्यात, तेज पान, मोठी विलायची, दालचिनी, मिरे घालून थोडे परतून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून, तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून भात तयार करून घ्या.
- 2
बेसनात वरील सर्व मसाले, दही आणि तेल टाकून, हाताने चांगले मिक्स करा. थोडे थोडे पाणी घालून कणीक जशी मळतो, त्या प्रकारे नरम गोळा तयार करा.
- 3
भिजवलेल्या गोळ्याचे चार भाग करून, 1/2 इंच मोठे रोल तयार करून घ्या.
- 4
एका भांड्यात पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. त्यात आता हे बेसनाचे रोल टाकून 10 ते 12 मिनिटे गॅस वर मध्यम आचेवर होऊ द्या. रोल झाले की ते वरती पाण्यावर येतात. तेव्हा गॅस बंद करा व पाण्यातून हे रोल काढून, प्लेटमध्ये काढून घ्या व थंड होण्यासाठी ठेवून द्या.
- 5
रोल थंड झाल्यावर चाकूने १ सेंटीमीटर चे मोठ्या तुकड्यांमध्ये गट्टेयाचे काप करून घ्या. (फोटोत दाखवीले तसे) कढई मध्ये तेल घालून, गोल्डन कलर येईस्तोवर गट्टे तळून घ्या. आपले बेसनाचे गट्टे तयार..
- 6
एक कढई घ्या. त्यात तेल किंवा तूप घाला. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जीरा घाला. मोहरी, जिरे तडतडले की त्यात कांदा, लसूनअदरक ची पेस्ट, हिरवी मिरची घालून एक मिनिटे परतून घ्या.नंतर यामध्ये काजु किसमिस घालून दोन मिनिटे होऊ द्या.
- 7
आता यामध्ये तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर, टमाटर मिरचीची पेस्ट घालून एक मिनिट वाफेवर शिजवून घ्या. नंतर यात तळलेले गट्टे घाला व छान मिक्स करून घ्या.
- 8
आता यामध्ये शिजवलेला भात घाला. चांगले मिक्स करून, दोन मिनिट वाफ काढून घ्या.वरून २ टेबलस्पून तूप घाला व कोथिंबीर घालून, दही रायता सोबत गरमागरम सर्व्ह करा. *राजस्थानी गट्टा पुलाव*.. 💃 💕
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (6)