काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)

#GA4 #Week5 की वर्ड-Cashew..काजू
राजघराणं सुक्यामेव्याचं...
काजू...सुकामेवा.. राजेशाही तामझाम..राजकुळातील मंडळी ही..काजू,बदाम,पिस्ता यांचे प्रस्थ म्हणजे राजा,प्रधान,सेनापतीच जणू...सगळं कसं..प्रोटोकॉल सारखं..मोजून मापून..भसाभसा वापर अगदी नियमबाह्य..वाट लागलीच तुमची म्हणून समजा..म्हणजे किंमती मुळे खिशाला चाट तर पडणारच आणि अती तिथे माती या उक्तीप्रमाणे खायला जाल तर आरोग्याची ऐशी की तैशी झालीच म्हणून
समजा..परत त्यावर डॉक्टरच्या वार्या, वेगवेगळ्या टेस्ट करा..हे सगळं टाळायचं तर या राजघराण्याशी कायम अदबीनेच पेश व्हायचं ..त्यातच आपलं हित..
मग हे राजघराणे आपल्यावर कायम खुश..त्यांच्याकडून सणावाराला आपल्यावर perks ची खैरात..कराल सेवा तर मिळेल मेवा..😇😋...
जगभरातल्या खाद्यसंस्कृती मध्ये या राजघराण्याची उपस्थिती त्या खाद्यसंस्कृतीला चार चांद लावून वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते..स्वतःचा राजेशाही थाट बहाल करते..जणू जहागिरी बहाल केली जाते आणि मग त्या पदार्थांचे चेहरे आगळ्या अलौकिक तेजाने तळपू लागतात...एकदम elegant personality प्राप्त होते..आणि चवी मध्ये तर एकदम richness add होतो..मग आपणही काही काळ ते राजघराणे उपभोगतो..😇😇..
थोडे उष्ण भडक डोक्याचे हो हे सगळे....पण काय करणार..राजघराण्यातील लहरी पणा हो..जरा त्यांचा ताल सांभाळला की झालं..😜
चला तर मग आपण सुकामेवा या राजघराण्यातील थोडे उष्ण डोक्याचे His Highness काजू महाराजांना साखरेची लाडीगोडी लावून तयार होणारे काजू चिक्की हे rich n ultimate व्यंजन पाहू या...😋

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मंद आचेवर एका कढईत काजू भाजून घ्यावेत.
- 2
आता मिक्सरमध्ये साखर दळून घ्यावी. आता त्याच कढईत तूप टाकून पिठीसाखर आणि glucon d साखर एकत्र करून low to medium gas वर ही साखर सतत ढवळत पूर्णपणे विरघळून घ्यावी.
- 3
साखर पूर्ण विरघळली की त्यात मध घालून ढवळावे..मग काजू घालून व्यवस्थित परतावे आणि वेलची पावडर घालून परत एकदा व्यवस्थित परतावे.
- 4
आता बटर पेपर ला थोडे तूप लावून त्यावर वरील मिश्रण पसरवून घ्यावे.. आणि त्यावर लाटणे फिरवून एक सारखे करून घ्यावे. मी इथे पोळपाटाला तुप लावून त्यावर काजू चे मिश्रण पसरवून घेतले आहे. आणि मग त्यावर लाटणे फिरवून व्यवस्थित एक सारखे केले आहे.
- 5
आता या पसरलेल्या मिश्रणावर सुरीने हलकेच मार्क करून घ्या म्हणजे आपल्याला चिक्की पाडता येईल.
- 6
हे वरील मिश्रण थोडे कोमट असतानाच सुरीने त्याच्या चिक्की पाडून घ्या.
- 7
अशाप्रकारे थंड झाल्यावर काजू चिक्की खायला तयार.
- 8
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)