कॅबेज-मूगडाळ भजी (cabbage moongdal pakoda recipe in marathi)

Ashwinee Vaidya @cook_26089892
कॅबेज-मूगडाळ भजी (cabbage moongdal pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मूगडाळ 4 तास भिजत घालावी. भिजलेली मूगडाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावी. कोबी बारीक चिरून घ्यावा. इतर सर्व साहित्य एका ठिकाणी घ्यावे.
- 2
एका भांड्यात मूगडाळीची भरड काढून घ्यावी. त्यात हळद व लसूण घालावा.
- 3
मिरची, आलं व कोबी घालावी
- 4
आता त्यात जीरा पावडर, धणे पावडर व हिंग घालावा.
- 5
मीठ घालून मीक्स करून घ्यावे. त्यात तांदूळाचे पीठ घालून घ्यावे.
- 6
आता मीक्स करून घ्यावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात चमच्याने लहान-लहान भजी घालावी.
- 7
तेलातील फेस पूर्णपणे नाहीसा झाला की भजी तळली गेली असे समजावे. भजी निथळणीत टिश्यू पेपरवर काढून ठेवावीत. तेल निथळल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावी.
- 8
गरमागरम भजी साॅस किंवा एखाद्या डीप साॅस बरोबर खायला द्यावीत. मी घरी तयार केलेल्या डीप साॅस बरोबर सर्ह्र केली आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14032459



























टिप्पण्या