शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)

शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आलं-लसूण पेस्ट करून घ्यावी. कांद्याची पेस्ट करून घ्यावी. टोमॅटोची प्युरी करावी.काजू व लाल सुक्या मिरच्यांची पेस्ट करून घ्यावी. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.
- 2
गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे त्यात ठेवावे. त्यात बटर घालावे. हिंग घालावा.
- 3
आलं-लसूण पेस्ट घालून एक मिनीट परतावे. कांदा पेस्ट घालून दोन मिनिटे परतावे. आता टोमॅटो प्युरी घालून दोन मिनिटे परतावे.
- 4
आता काजू पेस्ट, लाल मिरची पेस्ट घालून परतून घ्यावे. हळद घालावी.
- 5
तिखट, जीरा- धणे पावडर व शाही पनीर मसाला घालून परतून घ्यावे.
- 6
मीठ, कसूरी मेथी, मटार व पाणी घालावे.
- 7
साखर व फ्रेश क्रिम घालून परतून घ्यावे व झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
- 8
दोन ते तीन मिनीटानंतर झाकण काढून त्यात पनीर घालून मीक्स करून घ्यावे. दोन ते तीन मिनीटानंतर गॅस बंद करावा. भाजी सर्ह्रिंग वाटी मध्ये काढून कोथिंबीर व फ्रेश क्रिम घालून गार्नीश करावे.
- 9
शाही मटार पनीर तयार आहे. शाही मटार पनीर जीरा राईस व रोटी बरोबर सर्ह्र करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes






























टिप्पण्या