पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा,सिमला मिरची,पनीर चे चौकोनी तुकडे करून घ्या.खालील प्रमाणे तयारी करावी
- 2
चण्याचे पीठ कोरडेच भाजून घ्या.दही नि चण्याचे पीठ छान एकजीव करा गुठळ्या राहायला नको. त्यानंतर त्यात सर्व जिन्नस घालून छान मिसळून घ्या.
- 3
आता सिमला मिरची चे तुकडे नि कांद्याचे तुकडे मसाल्यात मिसळून घ्या व नंतर पनीरचे तुकडे टाकून अलगत हाताने मसाला लागेल असे मिसळून घ्या नि सर्व मॅरीनेट करण्यासाठी 15/20मिनीटे तरी ठेवा जास्त ठेवले तरी चालेल 1तास.
- 4
मॅरीनेट झाले कि खालीलप्रमाणे पनीर,सिमला मिरची,कांदा तुकडे स्टीकला टोचून घ्या.
- 5
आता तव्यावर 1/2टेबलस्पून बटर ग्रीस करा नि स्टीक ठेवा नि चारी बाजूंनी शेकून घ्या
- 6
मस्त झणझणीत पनीर टिका तयार आहे पुदिना चटणीबरोबर खायला द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14641473












टिप्पण्या