गोबी पकोडे (gobi pakode recipe in marathi)

सरिता बुरडे @cook_25124896
मोठ्यांपासून छोटेही आवडीने खातील असा घरच्याघरीच झटपट तयार होणारा स्नॅक्सचा प्रकार.
गोबी पकोडे (gobi pakode recipe in marathi)
मोठ्यांपासून छोटेही आवडीने खातील असा घरच्याघरीच झटपट तयार होणारा स्नॅक्सचा प्रकार.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात पाणी घालून त्यात मीठ आणि हळद टाकावे.
- 2
आता त्यात फुलकोबीचे फ्लोरेट्स टाकून 2 ते 3 मिनिटे वाफवून घ्यावे.
- 3
एका भांड्यात कॉर्न फ्लोअर, तांदळाचे पीठ घ्यावे आणि त्यात तिखट ऍड करावे.
- 4
आता त्यात आले-लसूणपेस्ट, धणे-जिरेपूड आणि गरम मसाला टाकावे.
- 5
आता त्यात दही घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 6
शेवटी चवीनुसार मीठ टाकावे.
- 7
आता त्यात फुलकोबीचे फ्लोरेट्स टाकून व्यवस्थित कोटींग करून घ्यावे.
- 8
कढईत तेल तापवून कोटींग केलेले फ्लोरेट्स गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यावे
- 9
सर्व्हिंग डिश मध्ये काढून वरून कोथिंबीरने गार्निश करावे. गरमागरम गोबी पकोडे तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14701904

























टिप्पण्या (3)