मालवणी सोलकढी (malwani solkadhi recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपी
महाराष्ट्रातल्या कोकण भागात मांसाहारा बरोबर हमखास सोलकढी हा पदार्थ आपल्याला बघायला मिळतो ! आंबट गोड चव असणारी ही सोलकढी जेवण झाल्यानंतर आपलं मन व पोट दोन्ही शांत ठेवायला मदत करते. म्हणूनच आपल्या आहारात नियमित सोलकढीचा समावेश असावा जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल.
सोलकढी हे कोकम व नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट,डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात.
पाहूयात रेसिपी...😊

कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य ब्लेंडरमधे काढून त्यात ग्लासभर पाणी घालून बारीक वाटून घ्या.
- 2
बीट घातल्यामुळे छान गुलाबी रंग येतो.
मिश्रण छान गाळून घ्या. - 3
पुन्हा एकदा चोथा आणि पाणी घालून बारीक वाटून घ्या. व पुन्हा एकदा छान गाळून घ्यावे.
- 4
नंतर त्यात कोकम सिरप घालून छान मिक्स करून पुन्हा एकदा मिश्रण गाळून घ्या.काही कण राहिले असतील तर पिताना त्रास नाही होणार.
- 5
फ्रिजमध्ये थंड करून वरून कोथिंबीर घालून सोलकढी सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या