पौष्टिक झुणका (zhunka recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
पौष्टिक झुणका (zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला छान तडतडली की,त्यात कांदा, आल, लसुण, मिरची पेस्ट घाला आणि परतून घ्या. नंतर लाल तिखट, हळद घालून मिक्स करा.
- 2
फोडणी मसाला छान झाला की त्यात, बारीक चिरलेला पातीचा कांदा,मेथी,मुळ्याचा पाला,कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून वाफवून घ्या.
- 3
हिरव्या भाज्या लवकर शिजतात. मग त्यात बेसन पेरून घ्या आणि चवीनुसार मीठ घाला थोडा पाण्याचा शिपका मारून झाकण ठेवून झुणका छान वाफवून घ्या.मोकळा झाला की गॅस बंद करा.
- 4
गरम गरम पौष्टिक झुणका कांदा, मिरची, चटणी भाकर किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15761501





टिप्पण्या (2)