मेथी-पनीर पराठा (Methi Paneer Paratha Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कणकेमध्ये जीरे, तेल, चवीपुरते मीठ आणि थोडे पाणी घालून पराठ्यासाठी कणिक मळून घ्यावी आणि 5 ते 10 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवावी.
- 2
आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत 2 मिनिटे परतून घ्यावा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावे.
- 3
आता त्यात हिरवी मिरची आणि स्वच्छ धुतलेली मेथीचे पाने घालून दोन ते तीन मिनिटे भाजी परतून घ्यावी.
- 4
आता त्यात हळद, तिखट, किचन किंग मसाला आणि गरम मसाला घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि गॅस बंद करून घ्यावे. (किसलेले पनीर घालण्याआधी गॅस बंद करून घ्यावा, जेणेकरून पनीर जळणार नाही.)
- 5
आता त्यात किसलेले पनीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे. आपले स्टफिंग चे सारण तयार आहे.
- 6
आता मळलेल्या कणकेची छोटी पोळी लाटून त्यात हे स्टफिंगचे सारण मधोमध भरून पोळीची किनार सर्व बाजूंनी दुमडून व्यवस्थित बंद करून घ्यावी.
- 7
त्याला थोडी कणिक लावून पोळी लाटून घ्यावी. गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवून त्यावर पोळीला दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजून घ्यावी.
- 8
पराठ्याचे मधोमध कट करून चार भाग करून घ्यावे आणि सर्व्हिंग डिश मध्ये काढून गरमागरम पराठा सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या (4)