साटोरी (Satori Recipe In Marathi)

#साटोरी... गणेश चतुर्थी स्पेशल साटोरी.... गुळ ,खोबरं ,खवा मिक्स अशी खुसखुशीत साटोरी गणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून केलेली.....
साटोरी (Satori Recipe In Marathi)
#साटोरी... गणेश चतुर्थी स्पेशल साटोरी.... गुळ ,खोबरं ,खवा मिक्स अशी खुसखुशीत साटोरी गणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून केलेली.....
कुकिंग सूचना
- 1
सगळं साहित्य काढून घेणे....... गॅसवर पॅन गरम करणे त्यात एक टेबलस्पून तूप टाकणे आणि ओल्या नारळाचा कीस टाकून एक मिनिट परतून घेणे....
- 2
किस परतून झाला की त्याच्यामध्ये गुळ टाकणे.. आणि गुळ वितळेपर्यंत परतून घेणे नंतर त्यात वेलची खसखस पूड,जायफळ ची पूड टाकून मिक्स करणे....
- 3
मिश्रणात खवा टाकणे आणि मिक्स करून गॅस बंद करणे.... थंड करायला मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवणे......
- 4
मैदा आणि गव्हाचे पीठ एका बाऊलमध्ये काढून घेणे त्यात तुपाचे मोहन आणि थोडेसे मीठ टाकणे...
- 5
पाणी टाकून पीठ साधारण घट्टसर भिजवून अर्धा तास झाकून ठेवणे..... नंतर तयार सारणाचा एक गोळा घेऊन भिजवलेल्या कणकेच्या पारी मध्ये स्टफ करणे आणि त्याची छोटीसी साटोरी लाटून घेणे....
- 6
गॅसवर तवा गरम करून त्यावर ही साटोरी टाकणे आणि मिडीयम आचेवर ते खालून वरून तूप लावून खमंग भाजून घेणे...कींवा तळणे.... साटोरी तयार.....गरम कींवा थंड कशीही सूंदर लागते.....
- 7
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या (2)