चटपटी पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#SCR भारती संतोष किणी

चटपटी पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)

#SCR भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोसफेद वटाणे
  2. 1पॉकेट तयार पाणीपुरी
  3. 1 वाटीस्वच्छ कोथिंबीर
  4. 1 वाटीपुदिन्याची पाने
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 4लसणाच्या पाकळ्या
  7. छोटाआल्याचा तुकडा
  8. 100 ग्रॅमचिंच
  9. 100 ग्रॅमगूळ
  10. 1 चमचालाल तिखट
  11. 1/2 चमचाहळद
  12. 2 चमचेजीरे पावडर
  13. 2 चमचेचाट मसाला
  14. 2 चमचेकाळे मीठ

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    रगडा- प्रथम सफेद वाटाणे स्वच्छ धुऊन सहा ते सात तास भिजवावे भिजवलेले वटाणे कुकरमध्ये घालून त्यात अर्धा चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ एक ग्लास पाणी घालून आठ ते दहा शिटी घ्यावी. कुकर थंड झाल्यावर त्यातील वटाणे काढून थोडे स्मॅशरने स्मॅश करावे रगडा तयार.

  2. 2

    हिरवी चटणी- प्रथम कोथिंबीर व पुदिना स्वच्छ धुवून त्याची पाने काढून घ्यावी व ती मिक्सरमध्ये घालावी त्यात मिरची लसूण आलं घालून बारीक पेस्ट करावी नंतर त्यात दोन ते अडीच ग्लास पाणी घालावे व जीरे पावडर, चाट मसाला,काळे मीठ घालून चांगले एकजीव करावे हिरवी चटणी तयार.

  3. 3

    गोड चटणी- प्रथम कुकरमध्ये गुळ व चिंच समप्रमाणात घेऊन त्यात थोडे पाणी घालावे व दोन शिट्ट्या आल्यानंतर कुकर बंद करावा कुकर थंड झाल्यावर त्यातील मिश्रण सर्व एकजीव करून गाळून घ्यावे गाळलेल्या चटणी लाल तिखट, जीरे पावडर,काळे मीठ, चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे.

  4. 4

    गोड चटणी तयार सर्व तयारी करून पाणीपुरीच्या पुऱ्या एकासाठी व्यवस्थित फोडून त्यात रगडा गोड चटणी घालावी व हिरवी चटणी भरून खाण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes